प्रत्येक रुग्णाजवळ आॅक्सिमिटर अत्यावश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 12:27 PM2020-06-16T12:27:52+5:302020-06-16T12:28:19+5:30
डेथ आॅडिट कमिटीने सुचविले उपाय : अहवाल सुपूर्द, निष्कर्ष गोपनिय, दोन रुग्णांमागे हवी एक परिचारिका
जळगाव : जिल्ह्यातील वाढता मृत्यूदर आटोक्यात आणायचा असेल तर सेंट्रल आॅक्सिजन सिस्टीम व प्रत्येकाजवळ आॅक्सिमिटर हवेच, यासह प्रत्येक दोन रुग्णामागे एक परिचारिका असावी, अशा काही उपाययोजना 'डेथ आॅडीट कमिटी'ने प्रशासनाला सुचविल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून समजते़ जिल्हाभरातील मृत्यूवर या समितीने सोमवारीच आपला दहा दिवसांचा अभ्यासपूर्ण अहवाल जिल्हाधिकारी डॉ़ अविनाश ढाकणे यांच्याकडे दुपारी अडीचवाजता सोपविलो़ हा अहवाल तातडीने शासनाकडे पाठविणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले़
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या सुचनेनुसार समिती स्थापन करण्यात आली होती़ त्यानुसार समितीचे अध्यक्ष तथा आयएमएचे अध्यक्ष डॉ़ दीपक पाटील, उॉ़ किरण मुठे, डॉ़ धीरज चौधरी, डॉ़ चंद्रय्या कांते, डॉ़ विजय गायकवाड यांनी हा अहवाल सोपविला़ या समितीने दहा दिवस मृत्यू झालेल्या ९३ केसेसचा अभ्यास केला. यात केसपेपर तपासण्यासह विविध तपासण्यांमधून माहिती संकलीत करून मृत्यूच्या कारणांचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.
सामान्य सूचना... ज्या रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार आहे, त्यांनी तसेच ५५ वर्षावरील कोणालाही थोडीही लक्षणे जाणवल्यास तातडीेन तपासणी करून घेणे व उपचार घेणे अत्यावश्यक आहे़ असा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते मृत्यूची कारणे नेमकी काय? याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे़
या सूचविल्या उपाययोजना
-एमसीआयच्या निर्देशानुसार प्रत्येक अतिदक्षता विभागात सेंट्रल आॅक्सिजन हवे, व्हँटीलेटर, एनआयव्ही,बायोपॅक मशिन हवे
-प्रत्येक दोन रुग्णांमागे एक परिचारिका हवी
-प्रत्येक दहा बेडच्या आयसीयूमध्ये एका शिफ्टमध्ये दोन डॉक्टर्स हवे
-प्रत्येक रुग्णाजवळ आॅक्सिमिटर हवे, मॉनिटर्स हवे
-दिवसा व सायंकाळी दोन अटेंडन्ट तर रात्री एक अटेंडन्ट हवा
-रक्त, लघवी यासह विविध तपासण्या करणारी मशिनरी हवी
-प्रयोगशाळेसाइी एबीजी गॅस अॅनालिसीय व्यवस्था हवी
-या उपाययोजना अत्यावश्यक असून यामुळे मृत्यूदर आटोक्यात येतील, असे समितीने नोंदविल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे़