ऑक्सिजन पातळी ६० व स्कोअर २४
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:12 AM2021-06-05T04:12:53+5:302021-06-05T04:12:53+5:30
इच्छाशक्तीच्या बळावर महिलेची कोरोनावर मात रावसाहेब भोसले पारोळा, जि. जळगाव. : कोरोनाची लागण झाल्यानंतर तीन दिवस घरीच उपचार झाले. ...
इच्छाशक्तीच्या बळावर महिलेची कोरोनावर मात
रावसाहेब भोसले
पारोळा, जि. जळगाव. : कोरोनाची लागण झाल्यानंतर तीन दिवस घरीच उपचार झाले. यामुळे तब्येत खालावली. ऑक्सिजन पातळी ६० ते ६२ आणि एचआरसीटी स्कोअर २४ होता. एवढी सगळी प्रतिकूल स्थिती असताना कलाबाई दिनकर जाधव (रा. टिटवी, ता. पारोळा) या महिलेने केवळ इच्छाशक्तीच्या बळावर कोरोनावर मात केली.
कलाबाई जाधव यांना कोरोनाची लागण झाली. दोन- तीन दिवस घरीच उपचार केले. याचदरम्यान यांची तब्येत खालावली. मुलगा कृष्णा जाधव याने पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले. तपासण्या केल्या असता ऑक्सिजन पातळी ६० ते ६२ व एचआरसीटी स्कोअर २४ होता. तरीही या महिलेला डॉक्टरांनी धीर दिला. तिला तात्काळ ऑक्सिजन देऊन उपचार सुरू केले. या महिलेची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार शक्य नव्हते.
कुटीर रुग्णालयातील डॉ. श्रीनाथ चौधरी, डॉ. जागृती पाटील, डॉ. प्रियंका बडगुजर, परिचारिका सुनीता मोरे, कोमल बिऱ्हाडे, मंगला पाटील, वाॅर्ड बॉय प्रेम वानखडे, रमेश वानखडे, रामकृष्ण पाटील, भूषण पाटील, दीपक पाटील, प्रसाद राजहंस, दीपक सोनार, नगरसेवक पी.जी. पाटील सामाजिक कार्यकर्ते दिनेश लोहार या सर्वांनी त्या परिवाराला धीर देत तेरा दिवस मदत केली
आणि १४ दिवसांनी ही महिला या कोरोनाच्या संकटातून पूर्णपणे बरी होऊन घरी गेली. या कुटुंबातील सर्वांनी मदत करणाऱ्यांचे आभार मानले. ही महिला टिटवी तांडा या गावी घरी पोहोचली. गावात दिनकर वासराम जाधव, कलाबाई जाधव व कृष्णा जाधव परिवाराने गावात या महिलेचे स्वागत केले आणि मग सर्वांचे डोळे भरून आले होते.