लोकसहभागातून कोविड रुग्णालयात आॅक्सिजन पाईप लाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 10:02 PM2020-06-20T22:02:08+5:302020-06-20T22:02:15+5:30

डॉक्टरांच्या प्रयत्नाने चोपडा येथील स्तुत्य कार्य, आणखी मदत जमा करुन विविध सुविधा उपलब्ध करण्याचा तरुणांचा मानस

Oxygen pipeline to Kovid Hospital through public participation | लोकसहभागातून कोविड रुग्णालयात आॅक्सिजन पाईप लाईन

लोकसहभागातून कोविड रुग्णालयात आॅक्सिजन पाईप लाईन

Next


चोपडा : येथील उपजिल्हा रुग्णालयात आॅक्सिजनची व्यवस्था आहे. परंतु रुग्णाच्या बेडला जोडणारी संयुक्त आॅक्सिजन पाईप लाईन नसल्याने बऱ्याच रुग्णांना जळगाव येथे किंवा इतर मोठ्या शहरांमध्ये हलवावे लागत असल्याने कोरोना रुग्णांना आॅक्सिजन पुरवठा हा मेडिसिनपेक्षाही महत्त्वाचा असतो, ही बाब लक्षात घेता येथील डॉक्टरांच्या प्रयत्नाने लोकसहभागातून आॅक्सिजन पाईप लाईनचे काम हाती घेतले आहे.
नुकतीच चोपड्याच्या डॉक्टरांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झूम अ‍ॅपवर बैठक झाली. त्यात डॉ. दीपक पाटील, डॉ.दिलीप पाटील, डॉ.लोकेंद्र महाजन, डॉ. विनीत व डॉ. अमित हरताळकर, डॉ. भाटिया, डॉ. देशपांडे, डॉ.नरेंद्र शिरसाठ यासाऱ्यांनी पेशंटची संख्या कमी करण्याच्या उपायासोबत रुग्ण चोपडा येथेच कसा बरा होईल यावर भर दिला.
यावेळी डॉ. पंकज पाटील यांनी सांगितले की, चोपडा कोविड सेंटरमध्ये लोकसहभागातून आॅक्सिजन स्तर तपासणी आणि प्रत्येक बेडला आॅक्सिजनची व्यवस्था जर झाली तर कोरोनाग्रस्त रुग्णांना जळगाव येथे व बाहेर पाठवण्याची शक्यता कमी होईल. त्यासाठी आॅक्सिजन पाईप लाईनची व्यवस्था होणे गरजेचे आहे असे सुचवले.
एक असा विचार आला की, प्रत्येक ठिकाणी सरकार पूर्ण पडणार नाही. केंद्राला संपूर्ण देशाची व राज्यसरकारला देखील संपूर्ण राज्याची काळजी घ्यायची आहे, या सोबत सरकारचे उत्पन्नाचे स्त्रोतदेखील कमी झाले आहेत. म्हणूनच आॅक्सिजनची व्यवस्था लोकसहभागातून करण्याचा विचार पुढे आला. यानंतर अनेकांनी मदतीचा हात देऊन एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये जमा झालेत. ते तहसीलदार अनिल गावीत यांच्याकडे सुपुर्द केलेत. कोविड रुग्णालय अर्थात उपजिल्हा रुग्णालयात कामास सुरुवात झाली असून जास्तीत जास्त रुग्णांना आॅक्सिजन पुरवठा करता येईल, अशी व्यवस्था होत आहे.
कोरोनामुक्त चोपडा अभियानातील कार्यकर्ते या रुग्णालयातील सेवा सुविधांसाठी परिश्रम घेत आहे. त्यासाठी मयूर शिंदे, रमाकांत सोनवणे, सी. एस. पाटील, विपीन बोरोले, कुलदीप पाटील, ऋषीकेश पाटील मेहनत घेत आहेत.

Web Title: Oxygen pipeline to Kovid Hospital through public participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.