पारोळा येथे ऑक्सिजन प्लांट मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:12 AM2021-07-19T04:12:20+5:302021-07-19T04:12:20+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पारोळा एरंडोल मतदारसंघात ऑक्सिजनच्या अभावी बहुतांश लोकांचा मृत्यू झाला. वेळेवर ऑक्सिजन मिळत नव्हता. ऑक्सिजन निर्मिती प्लांट ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पारोळा एरंडोल मतदारसंघात ऑक्सिजनच्या अभावी बहुतांश लोकांचा मृत्यू झाला. वेळेवर ऑक्सिजन मिळत नव्हता. ऑक्सिजन निर्मिती प्लांट कमी प्रमाणात होते. येणाऱ्या काळात प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन प्लांट उभारला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर आपण पारोळा येथे ऑक्सिजन प्लांटची मागणी केली होती. ही आपली मागणी शासनाने मंजूर केली आहे. त्यामुळे पारोळा तालुक्यात लवकरात लवकर प्रत्यक्ष ऑक्सिजन प्लांट उभारणीच्या कामाचा शुभारंभ केला जाईल. यामुळे ऑक्सिजनमुळे होणारे जीवितहानी वाचेल, अशी माहिती आमदार चिमणराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अमोल पाटील, चतुर बाबुराव पाटील, किशोर निंबाळकर, ज्ञानेश्वर आमले, मधुकर पाटील, बी.एन. पाटील, चेतन पाटील, प्रा.आर.बी. पाटील, अशोक मराठे आदी उपस्थित होते.