जीएमसीतील ऑक्सिजन प्लॅन्टचा दररोज घेतला जातो आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:16 AM2021-04-22T04:16:42+5:302021-04-22T04:16:42+5:30

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात असलेल्या ऑक्सिजन प्लॅन्टचा दररोज आढावा घेतला जातो. तसेच त्यासाठी एक समिती ...

The oxygen plant at GMC is reviewed daily | जीएमसीतील ऑक्सिजन प्लॅन्टचा दररोज घेतला जातो आढावा

जीएमसीतील ऑक्सिजन प्लॅन्टचा दररोज घेतला जातो आढावा

Next

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात असलेल्या ऑक्सिजन प्लॅन्टचा दररोज आढावा घेतला जातो. तसेच त्यासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली असून त्याच्या प्रमुख पदी डॉ. संदीप पटेल हे आहेत. बुधवारी सायंकाळी या प्लॅन्टमध्ये १२ किलो लिटर ऑक्सिजन असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी लोकमतशी बोलताना दिली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ऑक्सिजन नियोजन समिती गठित आहे. रुग्णालयासाठी २० के.एल.चा ऑक्सिजन टॅंक उभारण्यात आला असून याद्वारे मध्यवर्ती प्रणालीद्वारे रुग्णालयातील सुमारे ३२५ रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. तसेच सी २ येथे ६४ रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडरद्वारा पुरवठा होतो.

ऑक्सिजन टॅंकची पाईपलाईन तपासणी दोन तंत्रज्ञ नियमित करतात. त्यांना प्रत्येकी १२ तासांची ड्युटी देण्यात आली आहे. तसेच किरकोळ दुरुस्तीचे काम देखील नियमित केले जाते.

ऑक्सिजन नियंत्रणासाठीं जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक, अन्न व औषध प्रशासन यांच्या समन्वयाखाली जिल्ह्यात ऑक्सिजन नियोजन सुरु असते. तसेच ऑक्सिजन पुरवठा करणारे ठेकेदार यांच्याशी सातत्याने संवाद असल्याने व एक दिवसाआड ऑक्सिजन टँकर येत असल्याने शासकीय रुग्णालयात ऑक्सिजनविषयी कुठलीच कमतरता जाणवत नाही, तसेच अतिरिक्त ऑक्सिजन सिलिंडर देखील रुग्णालयात आहेत, अशीदेखील माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली.

Web Title: The oxygen plant at GMC is reviewed daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.