ऑक्सिजन प्रकल्पाची मशिनरी दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:12 AM2021-07-05T04:12:34+5:302021-07-05T04:12:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात केंद्र सरकारच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची मशिनरी रुग्णालयात दाखल झाली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात केंद्र सरकारच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची मशिनरी रुग्णालयात दाखल झाली आहे. कोईम्बतूर येथून एका ट्रकमध्ये ही मशिनरी आली आहे. डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे इंजिनिअर्स येऊन सोमवारी याची जोडणी करणार आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात केंद्र सरकारकडून १ हजार लीटर प्रतिमिनट या क्षमतेचा हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारा प्रकल्प उभा रहात आहे. याचे शेड बांधून पूर्ण झाले आहेत. या प्रकल्पासाठी लागणारी मशिनरी ट्रकमध्ये घेऊन चालक नईम खान व खैमुद्दीन हे दोघेही शनिवारी सायंकाळी रुग्णालयात दाखल झाले होते. यात तीन टँक व अन्य मशिनरी असल्याचे त्यांनी सांगितले. एक अन्य ट्रक आणखी साहित्य घेऊन येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, हे काम संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेअंतर्गत होत असल्याचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले. तांत्रिक बाबीसाठी त्यांचेच अभियंते येणार असून तेच जोडणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.