पी. आर. स्कूलमध्ये शाळेला ग्रंथ संपदा भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:14 AM2021-07-25T04:14:48+5:302021-07-25T04:14:48+5:30

धरणगाव : पी. आर. हायस्कूलच्या १९६९च्या जुन्या मॅट्रिकच्या विद्यार्थ्यांच्या वतीने पी. आर. हायस्कूलला गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साडेतीन हजार ...

P. R. Gift of textbooks to school at school | पी. आर. स्कूलमध्ये शाळेला ग्रंथ संपदा भेट

पी. आर. स्कूलमध्ये शाळेला ग्रंथ संपदा भेट

Next

धरणगाव : पी. आर. हायस्कूलच्या १९६९च्या जुन्या मॅट्रिकच्या विद्यार्थ्यांच्या वतीने पी. आर. हायस्कूलला गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साडेतीन हजार रुपयांची ग्रंथसंपदा आणि संविधानाची प्रास्ताविकता भेट म्हणून देऊन अनोखी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.

शाळेला परिवर्तनवादी ग्रंथांचा संच भेट म्हणून देऊन शाळेविषयीची आपली कृतज्ञता व्यक्त केली. सुमारे ७० वर्षे वय असलेले हे माजी विद्यार्थी विविध पदांवर काम करून सध्या सेवानिवृत्तीचे जीवन जगत आहेत. या वयातही शाळेला भेट देण्याचा त्यांचा उत्साह आणि आनंद भरभरून वाहत होता. शाळेतील जुन्या आठवणीना त्यांनी उजाळा दिला.

याप्रसंगी पी. आर. हायस्कूल संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरुण कुलकर्णी, सचिव डॉ. मिलिंद डहाळे, उपाध्यक्ष व्ही. टी. गालापुरे, सदस्य अजय पगारिया उपस्थित होते. मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे, उपमुख्याध्यापक आर. के. सपकाळे यांनी या माजी विद्यार्थ्यांचे स्वागत करून ग्रंथसंपदा स्वीकारली.

या बॅचचे विद्यार्थी तथा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते प्रा. दिगंबर कट्यारे, जळगाव व प्रभाकर अहिरराव (सेवानिवृत्त पोस्टमास्तर), सुरेश राठोड, वसंतराव पडोळ, रवींद्र भारोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. अनिस कार्यकर्ते प्रा. रवींद्र भदाणे, पत्रकार जितेंद्र महाजन हे अतिथी म्हणून उपस्थित होते.

Web Title: P. R. Gift of textbooks to school at school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.