पाचोरा शहर हगणदरीमुक्त घोषित
By admin | Published: June 8, 2017 05:47 PM2017-06-08T17:47:17+5:302017-06-08T17:47:17+5:30
समितीचा निर्णय : दिड कोटी रुपये मिळणार
Next
ऑनलाईन लोकमत
पाचोरा, दि.8- संपूर्ण भारत स्वच्छ अभियान अंतर्गत केंद्रीय समितीने पाचोरा शहराला भेट देऊन पाहणी केली होती. त्यानुसार पाचोरा शहर हगणदरी मुक्त झाल्याचे समितीने घोषित केले आहे. यासाठी पाचोरा नगरपालिकेला दीड कोटी रुपयांचे बक्षीस देखील घोषित करण्यात आले आहे,
पाचोरा नपा ने स्वच्छ भारत अभियानातनर्गत शहरात पे अँड युज तत्वावर 10 ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधले. त्याचा सुयोग्य वापर होत आहे आणखी 5 महत्वाच्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधकाम सुरू केले आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार शहरात 1333 कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालाय नव्हते, सव्र्हेक्षनांनंतर 1500 कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालये आढळले नाही. यानुसार न पा ने 1392 कुटुंबाना शासकीय योजने अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी पहिला हप्ता दिला होता. आजपावेतो 1006 शौचालय बांधून वापर करीत आहे , केंद्रीय समितीमध्ये दिल्ली येथील गुणनियंत्रक विभागाचे कृष्णा मिश्रा व धमेंद्र पांडे यांनी 31 मेरोजी शहराची पाहणी केली यात शाळा कॉलेज रेल्वे स्टेशन बस स्टँड, वंजारवाडी, स्मशानभूमी परिसर, गौडवस्ती, संभाजीनगर साम्राट अशोकनगर आठवडे बाजार या ठिकाणी पाहणी केली तसेच वैयक्तिक शौचालय तपासले. मुख्याधिकारी किरण देशमुख, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, आरोग्य निरीक्षक धनराज पाटील , नगरसेवक सतीश चेडे, मनीष भोसले, महेश सोमवंशी, विकास पाटील, अमोल चौधरी, संजय धमाळ , ललित सोनार, भिकन गायकवाड , अशपाक देशमुख , दत्तात्रय पाटील, किशोर मराठे, सुरेश पाटील, देवीदास देहाडे बापू ब्राrाणे, विनोद सोनवणे, नीलकंठ ब्राrाणे, प्रवीण ब्राrाणे, आदी उपस्थित होते.