पाचोरा आमदारांनी कोवीड सेंटरला साजरे केले रक्षाबंधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 05:25 PM2020-08-03T17:25:06+5:302020-08-03T17:25:16+5:30
लोकसहभागातून होतोय १०० खाटांचे कोविड सेंटर
पाचोरा : आमदार किशोर पाटील यांनी बांबरुड येथील कोविड सेंटरला भेट देऊन तेथील कोरोना योद्धा असलेल्या महिला कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधन साजरे करून एक नवीन आदर्श निर्माण केला.
यावेळी आमदार पाटील यांनी आज कोविड सेंटरच्या सुविधांची पाहणी केली. कोविड सेंटरला त्यांनी रक्षाबंधन साजरे कोरोन योद्धा महिला कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
लोकसहभागातून होतोय १०० खाटांचे कोविड सेंटर
सुमनताई इन्स्टिटयूट आॅफ फार्मसी येथे सामाजिक बांधिलकी जोपासणाºया दानशूर व्यक्तींच्या सहकायार्तून कुठलाही शासकीय निधी न घेता १०० रुग्ण क्षमता असलेले कोविड सेंटरचे काम पूर्णत्वाकडे आहे. या सेंटरलाा सुद्धा आमदारांनी भेट देऊन पाहणी केली. यातील आयसीयु सेंटरचे कामही अंतिम टप्प्यात आले असून सामाजिक जाणिवा जोपासणारे एक आदर्श निर्माण करणारे हे सेंटर ठरणार आहे.या संपूर्ण सामाजिक भावनेतून निर्माण झालेल्या सेंटरमध्ये नवीन पद्धतीचे कॉटस, गादी, बेडशीट, उशी, तसेच प्रत्येक रुग्णाला स्वतंत्र टेबल आणि खुर्ची देखील देण्यात येणार आहे. वरील सर्व सुविधांचे कामकाज अंतिम टप्प्यात आहे. तसेच या ठिकाणी आवश्यक बाब म्हणून आॅक्सिजन सुविधा युक्त ५ बेडस तयार करण्यात येणार आहेत. वरील सर्व कामकाज हे विविध दानशूर व्यक्तींच्या मदतीद्वारे करण्यात येत आहे. या सेंटरचे कामकाज मुदतीत पूर्ण होण्यासाठी सर्व महसूल , आरोग्य, नगरपालिका यंत्रणा परिश्रम घेत आहे.