पाचोरा नगर परिषदेचे कामकाज बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:34 AM2021-09-02T04:34:30+5:302021-09-02T04:34:30+5:30
पिंपळे या आपले कर्तव्य बजावत असताना एका माथेफिरूकडून त्यांच्यावर हल्ला झाला व यात त्यांची हाताची बोटे कापली गेली. एका ...
पिंपळे या आपले कर्तव्य बजावत असताना एका माथेफिरूकडून त्यांच्यावर हल्ला झाला व यात त्यांची हाताची बोटे कापली गेली. एका महिला अधिकाऱ्यावर झालेला भ्याड हल्ला संतापजनक असून, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेव्हा असे हल्ले करतात तेव्हा हल्ला झालेला अधिकारीच नव्हे तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खचते. त्यामुळे अशा प्रवृत्तीचा संघटित निषेध म्हणून ३१ ऑगस्ट रोजी पाचोरा नगर परिषदेचे संपूर्ण कामकाज कडकडीत बंद ठेवून गुन्हेगारास कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, सर्व नगर परिषद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली आहे.
यावेळी प्रकाश भोसले, दगडू मराठे, मधुकर सूर्यवंशी, दत्तात्रय जाधव, हेमंत क्षीरसागर, साईदास जाधव, प्रकाश पवार, रमेश भोसले, श्यामकांत अहिरे, चंद्रकांत चौधरी, विशाल मराठा, विलास देवकर, पांडुरंग धनगर, शरद घोडके, ललित सोनार, राजू शिंपी यांच्यासह सर्व कर्मचारी यांनी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना निवेदन दिले.
310821\31jal_5_31082021_12.jpg
पाचोरा नगर परिषदेचे कामकाज बंद