पाचोरा पीपल्स बँक अपहारप्रकरणी चेअरमनसह दोघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:17 AM2019-07-20T00:17:55+5:302019-07-20T00:20:34+5:30

दि पाचोरा पीपल्स बँकेत ५५.३३ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी तत्कालीन चेअरमन अशोक संघवी, संचालक किशोर शिरुडे व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन टिल्लू यांच्याविरोधात पाचोरा पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pachora People's Bank is a crime against the accused, including the chairman | पाचोरा पीपल्स बँक अपहारप्रकरणी चेअरमनसह दोघांविरुद्ध गुन्हा

पाचोरा पीपल्स बँक अपहारप्रकरणी चेअरमनसह दोघांविरुद्ध गुन्हा

Next
ठळक मुद्देबँकेच्या सभासदाने दिलेल्या फिर्यादीवरून तक्रारइतरांच्या मदतीने अपहाराचा आरोप

पाचोरा, जि.जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चार तालुक्यात विस्तार असलेल्या दि पाचोरा पीपल्स बँकेत ५५.३३ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी तत्कालीन चेअरमन अशोक संघवी, संचालक किशोर शिरुडे व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन टिल्लू यांच्याविरोधात पाचोरा पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, बँकेचे सभासद संदीप महाजन यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरुन बँकेचे अंतर्गत लेखा परीक्षण लेखापरीक्षक दिलीप गांधी यांनी केलेले आहे. यात त्यांनी अपहाराचा ठपका ठेवला. त्यात तात्कालीन चेअरमन अशोक संघवी, तत्कालीन सीईओ नितीन टिल्लू व तत्कालीन लेखा परीक्षक बी.एस. फडणवीस अँड असोसिएट नाशिक यांचा प्रामुख्याने यात सहभाग असल्याचा आरोप केला आहे.
चेक डिस्काऊंटींग या प्रकारात व तत्कालीन चेअरमन व इतरांनी अफरातफर केली असून रिझर्व बँकेच्या नियमानुसार चेक डिस्काऊंटींगला परवानगी नाही. मात्र बँकेत अशा प्रकारच्या चेकच्या माध्यमातून बनावट धनादेश सादर करून लाखो रुपये वापरल्याचे लेखा परीक्षणातून दिसून आले आहे. पाचोरा पीपल्सच्या एचडीएफसी बँकेतील खात्यावरून हा घोळ स्पष्टपणे दिसून येत असल्याचे म्हटले आहे.
यात पुढे म्हटले आहे की, काही कर्जदार खातेधारकांमधील मंडळी ही बँकेचे तत्कालीन चेअरमन आणि संचालकांचे निकटवर्तीय आहे. यामुळे १ एप्रिल २०१८ ते ९ नोव्हेंबर २०१८ या कालखंडात तत्कालीन चेअरमन अशोक संघवी व संचालक किशोर शिरूडे यांनी इतरांच्या मदतीने सुमारे ५५.३३ लाख रूपयांचा अपहार केला आहे. याशिवाय, फेब्रुवारी २०१९ पासून बँकेवर प्रशासक असतांनाही अशोक संघवी व नितीन टिल्लू यांनी सुधारणेच्या नावावर ठेकेदारांना मोठ्या रकमेची बिले अदा केली आहेत. यात सर्वांनी एकत्रितपणे ३,५४,८५४ रुपये प्रदान केले आहेत. तत्कालीन चेअरमन यांच्या नातेवाईकांना वाढीव दराने व्याज प्रदान केले असून कर्जावर मात्र कमी व्याजाची आकारणी केली आहे, असा आरोप केला आहे. म्हणून पाचोरा पोलिसात भाग पाच, गु.र.नं २७२/१९, भादवि ४०६, ४०८, ४०९, ४२०, ४६८, ४७१, ४४७ असह १२० बप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Pachora People's Bank is a crime against the accused, including the chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.