विद्यार्थ्यानी स्वच्छ केले पाचोरा रेल्वे स्टेशन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 01:29 AM2018-09-21T01:29:51+5:302018-09-21T01:32:33+5:30
पाचोरा येथील श्री. गो. से. हायस्कूलच्या स्काऊट आणि गाईडच्या विद्यार्थी व विद्यार्थीनींंनी रेल्वे स्थानकावर स्वच्छता अभियान राबवित एक आदर्श उभा केला.
पाचोरा : येथील गो.से. हायस्कूलच्या स्काऊट, गाईडच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच राबविलेल्या स्वच्छता अभियानांतर्गत पाचोरा रेल्वे स्टेशनची स्वच्छता करत एक नवीन आदर्श निर्माण केला.
मुख्याध्यापक एस.डी. पाटील, उपमुख्याध्यापक एल.एस. शिंपी, पर्यवेक्षिका पी.पी.पाटील यांचे मार्गदर्शनाखाली आणि स्काऊटचे जिल्हा सहाय्यक आयुक्त आणि पर्यवेक्षक बी.डी. बोरुडे यांचे नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
यावेळी रेल्वे स्टेशनवरील प्रवासी ये- जा करीत असलेला जीना, तसेच रेल्वे रुळावर , आॅफिसमध्ये आणि स्वच्छतागृहामध्ये विद्यार्थ्यांनी स्वच्छता केली.
या स्वच्छता अभियानात स्काऊट मास्टर तडवी , आर. बी. कोळी , पाचोरा स्टेशनचे स्टेशन मास्टर एस. टी.जाधव , मुख्य वाणिज्य पर्यवेक्षक आर.पी बागुल, बुकिंग क्लार्क जॉर्ज सालोमन आदी उपस्थित होते. श्री. गो. से. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी यावेळी कौतुक करून विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे देखील आभार मानले. या उपक्रमाबद्दल शाळेच कौतुक होत आहे.