पाचोरा पीपल्स बँकेवर प्रशासक कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 11:11 PM2018-11-26T23:11:44+5:302018-11-26T23:13:48+5:30
पाचोरा पीपल्स को आॅप बँकेवर सोमवारी पुन्हा प्रशासक नियुक्त केल्याचा जिल्हा उपनिबंधकांचा आदेश कायम ठेवल्याचा निकाल जॉईंट रजिष्ट्रार नासिक यांनी दिला आहे.
पाचोरा : पाचोरा पीपल्स को आॅप बँकेवर सोमवारी पुन्हा प्रशासक नियुक्त केल्याचा जिल्हा उपनिबंधकांचा आदेश कायम ठेवल्याचा निकाल जॉईंट रजिष्ट्रार नासिक यांनी दिला आहे. यामुळे चेअरमन अशोक संघवी यांच्याकडून सूत्र काढून घेण्यात येत असल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
दि पाचोरा पीपल्स को आॅप बँक चांगल्या स्थितीत असताना केवळ चेअरमन अशोक संघवी व संचालक मंडळातील निम्मे संचालक यांच्यातील मतभेदांमुळे ८ संचालकांनी अचानक सामूहिक राजीनामे दिले.निम्म्या संचालकानी जिल्हा उपनिबंधकांकडे राजीनामा देऊन प्रशासक म्हणून विवेक जगताप यांची नियुक्ती केली. या नियुक्तीला चेअरमन संघवी यांनी जॉईट रजिष्ट्रार नासिक यांचेकडे आव्हान देत प्रशासक नियुक्तीला स्टे मिळविला होता. अल्प मतातील सत्ताधारी चेअरमन अशोक संघवी यांनी बँकेची सूत्रे स्वीकारली. मात्र जॉईंट रजिष्ट्रार नासिक यांनी आज स्थगिती आदेश रद्द करून प्रशासकीय नियुक्ती योग्य असल्याचा निकाल दिला व पुनश्च बँकेची सूत्रे प्रशासक विवेक जगताप यांचेकडे दिली.
दरम्यान चेअरमन अशोक संघवी यांचेशी संपर्क केला असता वरिष्ठ कोर्टात दाद मागणार असल्याचे सांगितले.