पाचोरा तालुका पाणी टंचाईमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 10:53 PM2020-05-30T22:53:37+5:302020-05-30T22:53:41+5:30

जलसाठे ५० टक्के असल्याने तालुका झाला टँकरमुक्त

Pachora taluka is free from water scarcity | पाचोरा तालुका पाणी टंचाईमुक्त

पाचोरा तालुका पाणी टंचाईमुक्त

googlenewsNext



पाचोरा : सततच्या दुष्काळाने दरवर्षी तालुक्याला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते, मात्र यावर्षी तालुक्यातील जलसाठ्यात आद्यपही मुबलक पाणी साठा असल्याने पाचोरा तालुक्यातील १२८ गावांना यंदा पाणीटंचाई भासत नसून तालुका पाणी टंचाईमुक्त झाला असल्याची माहिती पाचोरा ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागीय अभियंता एस एस पवार यांनी दिली.पाचोरा तालुक्यात १०० ग्रामपंचायत असून १२८ गावे आहेत.सर्वच गावांना नळ पाणीपुरवठा योजना भारत निर्माण, स्वजलधारा,जल स्वराज, आदी योजनांद्वारे पाणीपुरवठा केला जातो.
तालुक्यात ३ मध्यम प्रकल्प हिवरा,बहुळा, अग्नावती, असून १५ लघु प्रकल्प राजुरी, पिंप्री सार्वे,गहुले, पिंपळगाव हरे, अटलगव्हाण, कोल्हे, सातंगाव,डांभुर्णी पिंप्री, बांबरुड रा प्राबो वाकडी, म्हसळा, गारखेडा, गाळण, दिघी, खाजोळा यासह गिरणा प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा होतो. तर १३पाझर तलाव तालुक्यात असून गिरणा नदीवरील योजनांद्वारे गिरणा काठावरील गावांना पाणीपुरवठा केला जातो. सन २०१९-२० ह्या वर्षात पाचोरा तालुक्यात सुमारे १५० टक्के पाऊस झाला. सर्व नद्यांना महापुर आले ,तर धरण साठे १०० टक्के भरल्याने रब्बी हंगामासाठी देखील पाटाद्वारे पाणी सोडण्याची वेळ आली नाही .

Web Title: Pachora taluka is free from water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.