पाचोरा तहसीलच्या जखमी शिपायाचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 11:59 PM2019-03-01T23:59:48+5:302019-03-02T00:00:57+5:30

अपघातात जखमी झालेले येथील तहसील कार्यालयातील शिपाई अनिल विठ्ठल जंजाळे (५४) यांचे अखेर १ मार्च रोजी निधन झाले. त्यांच्यावर २२ दिवसांपासून उपचार सुरू होते.

Pachora Tehsil's injured soldier died | पाचोरा तहसीलच्या जखमी शिपायाचे निधन

पाचोरा तहसीलच्या जखमी शिपायाचे निधन

Next
ठळक मुद्देरेल्वे अपघातात झाले होते जखमीसर्व शस्त्रक्रियाही झालेल्या होत्या२२ दिवसांच्या मृत्यूनंतर संघर्ष संपला

पाचोरा, जि.जळगाव : अपघातात जखमी झालेले येथील तहसील कार्यालयातील शिपाई अनिल विठ्ठल जंजाळे (५४) यांचे अखेर १ मार्च रोजी निधन झाले. त्यांच्यावर २२ दिवसांपासून उपचार सुरू होते.
पाचोरा रेल्वे स्टेशनवर ९ फेब्रुवारी रोजी झालेल्या अपघातात ते जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. सर्व शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या होत्या. मात्र आज १ रोजी सायंकाळी त्यांचा मृत्यूशी झुंज देणारा प्रवास अखेर संपला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा २ मार्च रोजी दुपारी १२ वाजता सरकारी निवासस्थान, उल्लास टॉकीज मागे, संभाजीनगर येथून त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे.
येथील तहसील कार्यालयात शिपाई पदावर कार्यरत असलेल्या अनिल जंजाळे यांचा रेल्वे अपघात झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या २ मार्च रोजी दुपारी १२ वाजता सरकारी निवास स्थान, उल्लास टॉकीज मागे, संभाजी नगर येथून त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे.

Web Title: Pachora Tehsil's injured soldier died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.