पाचोरा येथे महिलेने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 22:35 IST2021-01-09T22:34:44+5:302021-01-09T22:35:11+5:30
पाचोरा येथील संगीता अनिल पाटील नामक महिलेने शनिवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली.

पाचोरा येथे महिलेने घेतला गळफास
ठळक मुद्देआत्महत्येचे कारण गुलदस्त्यात.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाचोरा : शहरातील देशमुखवाडी भागात राहणाऱ्या संगीता अनिल पाटील (३२) या महिलेने स्वतःच्या राहत्या घरी कुणीही नसताना घराच्या छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दि ९ रोजी दुपारी ३.३०पूर्वी अनिल पाटील हे घरी नसताना पत्नी संगीता हिने गळफास घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. संगीता हिच्या दोन्ही मुली बाहेरगावी गेलेल्या होत्या, तर पती अनिल पाटील हे येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये कंपाउंडर म्हणून कामाला आहेत.