संकूल सुरू, रस्ते बंद; आॅनलाईन डिलिव्हरीला अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 12:22 PM2020-07-21T12:22:37+5:302020-07-21T12:22:50+5:30

जळगाव : कोरोनामुळे गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेले शहरातील लहान-मोठे व्यापारी संकूल सोमवार, २० जुलैपासून उघडले. यात छोट्या संकुलांमधील ...

Packages start, roads closed; Difficulties in online delivery | संकूल सुरू, रस्ते बंद; आॅनलाईन डिलिव्हरीला अडचणी

संकूल सुरू, रस्ते बंद; आॅनलाईन डिलिव्हरीला अडचणी

googlenewsNext

जळगाव : कोरोनामुळे गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेले शहरातील लहान-मोठे व्यापारी संकूल सोमवार, २० जुलैपासून उघडले. यात छोट्या संकुलांमधील दुकाने सुरू झाली, मात्र महात्मा फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट या मोठ्या संकुलांमधून केवळ आॅनलाईन विक्रीला परवानगी असली तरी बाजारपेठेतील रस्ते बंद करून ठेवण्यात आल्याने विक्रेत्यांनाही माल पोहचविताना अडचणी येऊ शकतात तसेच सम-विषम बाबत संभ्रम असल्याने मोठ्या संकुलांमधील दुकाने दुपारी काही वेळ उघडून साफसफाई करण्यात येऊन पुन्हा बंद करण्यात आली. त्यामुळे संकुल सुरू, रस्ते बंद व आॅनलाईन पद्धतीला फारसा प्रतिसाद न मिळणे, अशा स्थितीमुळे दोन्ही प्रकारच्या संकुलांमधील विक्रेत्यांचा व्यवसायाने अद्यापही गती घेतली नाही.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्चपासून शहरातील व्यापारी संकुले बंद असल्याने व्यापाऱ्यांसमोर संकट उभे राहण्यासह अर्थचक्रही मंदावले. चार महिन्यांच्या काळात महत्त्वाचे सण, उत्सव निघून गेल्याने माल भरून ठेवला असतानाही व्यवसाय करू शकत नसल्याने व्यापारी बांधव हतबल झाले होते. इतर व्यवसायांना परवानगी मिळत असताना संकुलांमधील व्यापारी बांधवांसह विविध व्यापारी संघटनांनी ही संकुले सुरू होण्यासाठी पाठपुरावा केला.

साफसफाई करून दुकाने पुन्हा बंद
महात्मा फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, गोलाणी मार्केट, बी.जे. मार्केट, महात्मा गांधी मार्केट, आंबेडकर मार्केटमधील दुकानांना दुपारी १२ ते ४ दरम्यान, होम डिलिव्हरी किंवा आॅनलाईन व्यवसाय करता येणार असल्याने या ठिकाणी पाहणी केली असता दुपारी साडेबारा वाजेपर्यंतही दुकाने उघडलेली नव्हती. त्यानंतर काही दुकाने उघडण्यात आली. मात्र अनेकांनी साफसफाई करून दुकाने पुन्हा बंद केली.

Web Title: Packages start, roads closed; Difficulties in online delivery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.