खान्देशात पावणेदोन लाख शेतकºयांनी उतरविला पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 12:27 AM2017-08-01T00:27:50+5:302017-08-01T00:32:20+5:30

जळगाव/धुळे/ नंदुरबार : शेवटच्या क्षणापर्यंत शेतकºयांची धावपळ, बॅँका, कृषी विभागाच्या मदतीमुळे अडचणी दूर

Paddy Livelihood Farmers Eliminated Crop Insurance at Khandesh | खान्देशात पावणेदोन लाख शेतकºयांनी उतरविला पीक विमा

खान्देशात पावणेदोन लाख शेतकºयांनी उतरविला पीक विमा

Next
ठळक मुद्दे जळगाव, धुळे, नंदुरबारातील शेतकºयांचा समावेशबँकामध्ये होती गर्दीमुदत वाढ मिळण्याची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव / धुळे / नंदुरबार : पंतप्रधान पीक विमा हप्ता भरण्याच्या शेवटच्या दिवशी ३१ जुलै रोजी जिल्हाभरातील बॅँकांमध्ये मोठी गर्दी झाली होती. खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात जवळपास पावणेदोन लाख शेतकºयांनी पीक विमा उतरविल्याची माहिती आहे.
जळगाव जिल्ह्यात ६८ हजार शेतकºयांनी पीक विमा उतरविला. धुळे जिल्ह्यात अंदाजे ७० हजार तर नंदुरबार जिल्ह्यात यंदा ४२ हजार शेतकºयांनी पीक विमा काढल्याची माहिती आहे़
पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची ३१ जुलै अखेरची मुदत होती. यासाठी ३० जुलै रोजी रविवारीदेखील बँका सुरू ठेवण्यात आल्या होत्या.
जळगाव जिल्ह्यात ६८ हजार ३८४
सोमवारी अखेरच्या दिवशी जळगाव जिल्ह्यातील शेतकºयांची संख्या कृषी विभागाकडून एकत्रित करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यात ९० हजार ६७३.२९ हेक्टरसाठी ६८ हजार ३८४ शेतकºयांनी पीक विमा उतरविला.
मुदतवाढीचा प्रतीक्षा
या योजनेचा जास्तीत जास्त शेतकºयांना लाभ व्हावा यासाठी कृषी विभागाच्या वतीने मुदतवाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र अद्याप त्याला मंजुरी मिळालेली नाही. मुदतवाढ मिळण्याची प्रतीक्षा केली जात आहे.
दरम्यान, सोमवारी आलेली आकडेवारी ही उद्या आणखी बदलण्याची शक्यता आहे. कारण अखेरचा दिवस असल्याने जिल्हा बँक रात्री उशिरापर्यंत हे अर्ज स्वीकारणार असल्याने १ आॅगस्ट रोजी नेमकी आकडेवारी स्पष्ट होईल, असेही सांगण्यात आले.
धुळ्यात शेवटच्या दिवशी गर्दी
पीक विमा हप्ता भरण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी जिल्हाभरातील बॅँकांमध्ये मोठी गर्दी झाली होती. कोणी शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा व राष्टÑीयीकृत बॅँकांनी विशेष व्यवस्था केली होती. कृषी विभागाच्या कर्मचाºयांनी बॅँकांमध्ये जाऊन अर्ज भरण्यास शेतकºयांना मदत केली. जिल्हा बॅँकेच्या धुळे व नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यात एकूण ९० शाखांमध्ये सर्व काउंटर्सवर पीक विमा हप्त्याची रक्कम स्वीकारण्यात येत होती.
उशिरापर्यंत थांबून कामकाज
जिल्हा बॅँकेचे धुळे व नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यात सर्वाधिक कर्जदार शेतकरी सभासद आहेत. त्यामुळे त्यांची गैरसोय टाळण्यासाठी आपल्या सर्व ९० शाखा कार्यालयांमध्ये कोणत्याही काउंटरवर पीक विमा हप्त्याची रक्कम स्वीकारण्याच्या सूचना शाखाधिकाºयांना यापूर्वीच देण्यात आल्या होत्या, अशी माहिती जिल्हा बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
अर्जासाठी कर्मचाºयांची मदत
शेवटच्या दिवशी प्रत्यक्ष बॅँकांमध्ये काय परिस्थिती आहे, यासाठी आपण स्वत: पथकासह शिंदखेडा तालुक्यातील शिंदखेडा, चिमठाणे, वीरदेल आदी विविध ठिकाणी असलेल्या बॅँकांमध्ये जाऊन माहिती घेतली.
कृषी विभागाचे कर्मचारी बॅँकांमध्ये थांबून शेतकºयांना अर्ज भरण्यासाठी तसेच काही अडचण उद्भवल्यास मार्गदर्शनासाठी उपस्थित होते, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे यांनी दिली.
पीक विम्यास प्राधान्य
जिल्ह्यात राष्टÑीयकृत बॅँकांमध्येही शेतकºयांची पीक विमा हप्ता भरण्यासाठी तुरळक गर्दी होती. शेवटचा दिवस असल्याने या कामास प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे कामकाज सुरू असल्याने कुठेही शेतकºयांना अडचण आली नाही, अशी माहिती अग्रणी (लीड) बॅँकेचे व्यवस्थापक प्रदीप गिलाणकर यांनी दिली.
३१ जुलै हा अनेक कारणांसाठी सर्वांच्याच लक्षात राहिल. कारण आयकर रिटर्नसाठी ही शेवटची तारीख होती. शेतकºयांच्या पीक विम्यासाठी ३१ जुलैची डेडलाईन होती. तसेच सध्या नवमतदारांची नोंदणी सुरू आहे. त्यासाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीखही ३१ जुलैच होती.


 

Web Title: Paddy Livelihood Farmers Eliminated Crop Insurance at Khandesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.