महाराष्ट्र भ्रमंती करणाऱ्या सायकलस्वारासोबत 'जळगाव सायकलिस्ट'ची पद्मालय राईड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 08:23 PM2020-11-07T20:23:24+5:302020-11-07T20:23:41+5:30
पुरुषांसोबत महिला विद्यार्थ्यांचाही सहभाग : जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते गौरव
जळगाव : २४ दिवसांत सायकलने चार हजार किलोमीटर प्रवास करीत महाराष्ट्रातील ३६ जाऊन शहीदांना श्रध्दांजली व कोरोना योध्दा डॉक्टर, नर्स यांच्या प्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र भ्रमंती करणाऱ्या अजित पांडुरंग दळवी या सायकल स्वरा सोबत जळगाव सायकलिस्ट ग्रुपने पद्मालय राईड करीत सायकलने शंभर किलोमीटरचा प्रवास एकाच दिवसात पूर्ण केला यामध्ये पुरुषांसह महिला व विद्यार्थी देखील सहभागी झाले होते.
१९ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान २४ दिवसांत सायकलने ४ हजार किलोमीटर प्रवास करीत महाराष्ट्रातील ३६ जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन शहीदांना श्रध्दांजली व कोरोना योध्दा डॉक्टर नर्स यांच्या प्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी अजित दळवी यांनी सायकलवर महाराष्ट्र भ्रमंती केली. दळवी यांचा सन्मान करण्यासाठी त्यांना जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील व जळगावातील सायकलप्रेमी मंडळींनी जळगावात आमंत्रित केले होते. या भेटीदरम्यान दळवी यांच्या सन्मानाराथऀ पद्मालय सायकल राईडचे आयोजन करण्यात आले.
त्यानुसार दळवी यांच्या सोबत पहाटे पाच वाजता जळगाव शहरातून जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांच्या आवाहनास प्रतिसाद देत ४० सायकलिस्ट तसेच पहाटे साडेतीन वाजता चाळीसगाव येथून टोनी पंजाबी, रवींद्र पाटील, सोपान चौधरी, अरुण महाजन हे चार सायकलिस्ट सायकल राईड करत सोशियल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत पद्मालय येथे पोहचले. या सर्व मंडळींनी पद्मालय देवस्थानचे विश्वस्त डॉ. पिंगळे यांच्याकडून पद्मालय तीर्थक्षेत्राबाबत माहिती जाणून घेतले. लॉकडाऊनचे निर्बंध असल्यामुळे मंदिर परिसराच्या बाहेर वनविभागाच्या विश्रामगृहाच्या मोकळ्या जागी सर्व सायकलिस्ट थांबले होते.
महिला व विद्यार्थ्यांचे १०० किलोमीटर सायकलिंग
या राईडमध्ये तीन महिला सायकालिस्ट सहभागी झाल्या होत्या. विना गिअरच्या सायकली चालवत त्यांनी सुमारे ६५ किमी अंतर सायकलिंग केली. एक ग्रुप पद्मालय पासून पुढे एरंडोल पर्यंत जाऊन जळगाव शहरात परत येऊन त्यांनी सायकलिंगचे शतक पूर्ण केले. यात शालेय विद्यार्थी अनिकेत पाटील, प्रथमेश मणियार व महिला गटातून कामिनी धांडे यांचा समावेश होता. चाळीसगाव येथील टोनी पंजाबी, रवींद्र पाटील, सोपान चौधरी, अरुण महाजन या चार सायकलीस्टने धुळे मार्गे चाळीसगावला परत जात २०० किलोमीटर सायकलिंग केली.
सायंकाळी नियोजन सभागृहात अजित दळवी यांचा व प्रथमच शतक पूर्ण करणाऱ्या सर्व सायकलिस्ट तसेच नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या एनसीएफ मिशन फोर हेल्थ चॅलेंज या स्पर्धेत एक हजार, दोन हजार व तीन हजार किमी सायकलिंग पूर्ण करणारे सायकलिस्ट जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्रा.दीपक दलाल, प्रा.अजय पाटील यांचा सत्कार नियोजन भवनात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी मंचावर सेवानिवृत्त उपायुक्त (नियोजन) के.एन.पाटील व प्रतापराव पाटील उपस्थित होते.
पद्मालय राईड दरम्यान जीवनातील पहिली १०० किमीची राईड करणा-या सर्व जळगाव सायकलिस्ट यांचा सत्कार गुलाब पुष्प व कॉफी टेबल बुक देऊन करण्यात आला. यात दीपक दलाल, किशोर पवार, प्रथमेश मणियार, अनिकेत पाटील, अमोल देशमुख, जुझार शकिर, कामिनी धांडे, महेश सोनी, नीलेश वाघ व विजय पाटील यांचा समावेश होता. तसेच स्नेहा लुनिया यांनी नॉन गियर सायकल पद्मालय राईड पूर्ण केल्याबद्दल त्यांचा देखील सत्कार करण्यात आला.