पाचोरा येथे मुलींनी दिला आईला अग्निडाग
By admin | Published: March 27, 2017 06:51 PM2017-03-27T18:51:53+5:302017-03-27T18:51:53+5:30
कृष्णापुरी भागातील मुलीने आपल्या आईच्या चितेला अग्निडाग दिल्याची घटना सोमवार 27 रोजी घडली.
Next
पाचोरा,दि.27- येथील कृष्णापुरी भागातील मुलीने आपल्या आईच्या चितेला अग्निडाग दिल्याची घटना सोमवार 27 रोजी घडली. भावाने आईच्या अंत्यसंस्काराला येणे टाळल्याने बहिणींनी घेतलेल्या या निर्णयाचे परिसरातून स्वागत करण्यात येत आहे.
पाचोरा येथील कृष्णापुरी भागातील मुंबई नागपूर हायवे रोड वरील रहिवाशी रामलाल राठोड याच्या प}ी सगुणाबाई रामलाल राठोड वय 56 याचे काल रात्री 10 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले सगुणाबाई यांना तीन मुली, एक मुलगा, पती असा परिवार आहे. त्यांचा मुलगा जगदीश हा गेल्या चार ते पाच वर्षा पासून आपल्या वृद्ध आई वडिलांचा सांभाळ नकरता त्याच्या सासरी निघून घेला होता. या ठिकाणी देखील पतीप}ीचे भांडण झाले. त्यानंतर जगदीश तिथून देखील बेपत्ता झाला होता. आईच्या निधनानंतर नातेवाईकांनी जगदीश याला दूरध्वनी वरून संपर्क साधला असताना त्याने आईच्या अंत्ययात्रेत येण्यास टाळले. शेवटी कै सगुणाबाई रामलाल राठोड याच्या तिन्ही मुली आरती, शितल व भारती यांनी आईच्या चितेला अग्निडाग दिला. राठोड समाजातील हे पहिलेच उदाहरण असल्याचे यावेळी समाजातील लोकांनी सांगितले