पहूरच्या कृषी पंडित पतसंस्थेचा दोनशे दिव्यांगांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:12 AM2021-06-05T04:12:43+5:302021-06-05T04:12:43+5:30
अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक राहुल खताळ होते. यावेळी माजी जि. प. कृषी सभापती प्रदीप लोढा, व्यवस्थापक कैलास पाटील, ...
अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक राहुल खताळ होते.
यावेळी माजी जि. प. कृषी सभापती प्रदीप लोढा, व्यवस्थापक कैलास पाटील, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष शैलेश पाटील, ॲड. एस. आर. पाटील, पहूर कसबे विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर करवंदे, राजू जेंटलमन, किरण पाटील, रवींद्र लाठे, दिव्यांग संघटनेचे रवि झाल्टे यांनी मनोगत व्यक्त केले. सामाजिक भावनेतून पहूर-पाळधी परिसरातील सुमारे २०० दिव्यांग बांधवांना प्रत्येकी दोनशे ५१ रुपये याप्रमाणे रोख स्वरूपात मदत देण्यात आली. प्रातिनिधिक स्वरूपात काही दिव्यांग बांधवांना पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या हस्ते मदत सुपुर्द करण्यात आली. कृषी पंडित मोहनलाल ओंकारदास लोढा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन बाबूराव पांढरे, संचालक योगेश बनकर, उपसरपंच श्याम सावळे, विवेक जाधव, शंकर भामेरे, अरुण घोलप यांच्यासह संचालक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रल्हाद वानखेडे यांनी केले. व्यवस्थापक कैलास पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक देठे, प्रमोद पाटील, अमित पाटील, ईश्वर बारी, जनार्दन घुले ,रामेश्वर पगारे, पंकज धुळसंधीर आदींनी परीश्रम घेतले.
कॅप्शन : पहूर येथे दिव्यांग बांधवांना आर्थिक मदत देताना राहुल खताळ. समवेत प्रदीप लोढा, बाबूराव पांढरे, प्रकाश लोढा, प्रल्हाद वानखेडे आदी.
०५सीडीजे ४