सोमवारपासून खासगी रुग्णालयात सशुल्क कोव्हॅक्सिन लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:16 AM2021-05-23T04:16:21+5:302021-05-23T04:16:21+5:30

जळगाव : जिल्हाभरातील खासगी ३४ केंद्रांना जिल्हा प्रशासनाने कोविड लसीकरणासाठी परवानगी दिली असून, यातील विश्वप्रभा रुग्णालयात सोमवारपासून कोव्हॅक्सिन लसीचे ...

Paid covacin vaccination at a private hospital from Monday | सोमवारपासून खासगी रुग्णालयात सशुल्क कोव्हॅक्सिन लसीकरण

सोमवारपासून खासगी रुग्णालयात सशुल्क कोव्हॅक्सिन लसीकरण

Next

जळगाव : जिल्हाभरातील खासगी ३४ केंद्रांना जिल्हा प्रशासनाने कोविड लसीकरणासाठी परवानगी दिली असून, यातील विश्वप्रभा रुग्णालयात सोमवारपासून कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध होणार आहे. दरम्यान, लसीचे डोस संपल्यामुळे शहरातील सर्व शासकीय केंद्र रविवारी बंद राहणार आहे. सोमवारी कोविशिल्ड लस उपलब्ध होण्याचे संकेत आहेत.

जिल्ह्यात शासकीय यंत्रणेत लसीचा मुबलक पुरवठा होत नसल्याने लसीकरण एक दिवसानंतर बंदच राहत आहे. केंद्रांवरची गर्दी मात्र, ओसरली आहे. एकीकडे खासगीत १८ ते ४४ वयोगटांचे लसीकरण कधी सुरू होते, याकडे सर्वांचे लक्ष असताना आता खासगीतील काही केंद्रांनी कोव्हॅक्सिनचे डोस खरेदी केले आहे. जळगाव शहरातील आमच्या रुग्णालयात सोमवारपासून लसीकरण होणार असल्याचे डॉ. राजेश पाटील यांनी सांगितले. यासाठी कोविन ॲप, आरोग्य सेतू ॲपवर नोंदणी करावी किंवा, रुग्णालाकडे नोंदणी करावी, असे दोन पर्याय त्यांनी खुले ठेवले असून लस घ्यायच्या एक दिवस आधी रुग्णालयाकडे नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर रुग्णालयाकडून संबधितांना वेळ कळवून लसीकरणाला बोलवले जाणार आहे. आतापर्यंत ४्०० ते ५०० जणांनी नोंदणी केली असून, पहिला व दुसरा डोस असे दोनही डोस १८ वर्षांवरील सर्वांसाठी केवळ गर्भवती सोडून स्तनदा मातांही लस घेऊ शकतील, असे डॉ. राजेश पाटील यांनी सांगितले आहे.

Web Title: Paid covacin vaccination at a private hospital from Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.