वेदनेतून चांगल्या कार्याची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 12:18 PM2019-02-01T12:18:52+5:302019-02-01T12:18:58+5:30

भैय्याजी जोशी यांचे प्रतिपादन

Painful production creation | वेदनेतून चांगल्या कार्याची निर्मिती

वेदनेतून चांगल्या कार्याची निर्मिती

googlenewsNext
ठळक मुद्देडॉ.आचार्य अविनाशी सेवा पुरस्काराचे वितरण




जळगाव : योजना करून सेवा कार्य करता येत नाही. एखादे दृश्य बघितल्यावर जी वेदना मनात निर्माण होते त्यातूनच चांगले कार्य उभे रहाते. आज गौरव होणाऱ्या संस्थांचे कार्य हे अशाच भावनेतून उभे राहिले आहे. आईच्या हृदयाची भावना मनात ठेऊन अशा कार्यांच्या पाठीशी समाजानेही उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन रा.स्व. संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी गुरूवारी सायंकाळी येथे आयोजित डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी केले.
केशव स्मृती सेवासंस्था समूह व जळगाव जनता सहकारी बॅँकेच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात २०१७-१८ चा डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार वैयक्तीक गटातून सहारा अनाथालय गेवराई येथील संतोष गर्जे यांना देण्यात आला. तर संस्थात्मक गटातून औरंगाबाद येथील ‘साकार’ संस्थेस देण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सविता पानट व पदाधिकाºयांनी हा पुरस्कार स्वीकारला. वैयक्तीक गटात स्मृतीचिन्ह आणि ५० हजार रुपये रोख आणि संस्था गटात स्मृतीचिन्ह व एक लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप होते.
प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक पुखराज पगारिया, रा.स्व. संघाचे प्रांत संघचालक मधुकरराव जाधव, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, जनता सहकारी बॅँकेचे अध्यक्ष प्राचार्य अनिल राव, उपाध्यक्ष डॉ. प्रताप जाधव, बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील, सत्कारमूर्ती डॉ. सविता पानट, संतोष गर्जे आदी होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वालन करण्यात आले. यानंतर सत्कारार्थीच्या संस्थांचा कार्याची चित्रफित दाखविण्यात आली.
प्रगती झाली पण...
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाची प्रगती झाली. अन्नधान्य, विज्ञान, शिक्षण, वैद्यकीय सुविधा येथे आहेत. ८० कोटी लोकांच्या हातात मोबाईल आहे. मात्र दुसरीकडे दृष्टीक्षेप टाकला तर वेदना दायक दृश्य आहे. अनेकांना वेळेवर औषध मिळत नाही. आजाराशी झुंज देणारे वनवासी बांधव देशात आहेत. शाळा आहे पण शिक्षा नाही.
देशात ३५ कोटींच्या जवळपास जनता दारिद्रय रेषेखाली जीवन जगत आहे. समाजातील या वर्गाचे चिंतन कोण करणार? असा सवाल त्यांनी यावेळी केला. हा अंधकार दूर करण्यासाठी दिव्या सारखे उभे राहून अंधार दूर करण्याची गरज आहे. दृश्यानुभूतीतून सेवा होते, दृश्य बघितल्यावर जी वेदना मनात निर्माण होते त्यातूनच कार्य उभे रहाते. समाजात दातृत्व करणारी मंडळीही आहे. या मार्गावरून चालणारे थकणार नाहीत, अशी मदत समाजाने सेवा भावाने कार्य करणाºयांना करावी, असे आवाहन त्यांनी केले.
उद्योजक पुखराज पगारिया यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर यांनी केले. ‘साकार’ संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष सुरू आहे. या वर्षात पुरस्कार मिळणे ही आम्हा सर्वांच्या कार्याची पावती असल्याचे डॉ. सविता पानट म्हणाल्या.
डॉ. आचार्य कुटुंबियांची उपस्थिती
यावेळी अनुराधा आचार्य, मुलगी डॉ. आरती आचार्य-हुजुरबाजार, जावई डॉ. संजीव हुजूरबााजर, नातू शिवम हे देखील उपस्थित होते. यासह संघ परिवारातील स्वयंसेवक, केशव स्मृती अंतर्गत संस्थांचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन संगिता अट्रावलकर व संदीप लाड यांनी केले. किरण सोहळे यांनी वैयक्तीक गीत सादर केले. प्राचार्य अनिल राव यांनी आभार मानले.
अनाथांच्या नाथा तुज नमो
भैय्याजी जोशी पुढे म्हणाले की, ‘अनाथांच्या नाथा तुज नमो’ आज या भजनाची आठवण झाली. ज्यांचा येथे सत्कार होत आहे त्या व्यक्ती व संस्था नमन करण्यासारख्याच आहेत. पुरस्कार अशा व्यक्तीच्या नावाने दिला जातोय ती व्यक्ती ‘आचार्य दादा नावाने ओळखली जात होती. समर्पण, संवेदना, कर्तृत्व, जीवनभराची सक्रियता म्हणजे दादा. या नावामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढते आहे. सेवा हा बोलण्याचा विषय नाही. ज्यांचा येथे सत्कार झाला त्यांना आपण उपकृत करत आहोत असो भावही नसावा. समाज असा घडावा की अशा संस्थांची गरज राहू नये.
वेदनांशी समरस व्हा...समाजाने दुसºयांच्या वेदनांशी समरस व्हावे, अशी अपेक्षा संतोष गर्जे यांनी व्यक्त केली. हा पुरस्कार अनाथालयातील माझ्या लेकरांना व मदत करणाºयांना समर्पित करतो, असेही ते म्हणाले. या व्यक्तींमुळेच जगण्याचा मार्ग मिळाल्याचे ते म्हणाले.

Web Title: Painful production creation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.