चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराने स्नेहसंमेलनात रंगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 03:52 PM2019-01-01T15:52:41+5:302019-01-01T15:53:53+5:30
भडगाव येथील श्री साई समर्थ स्कूलमध्ये स्नेहसंमेलन
भडगाव : श्री साई समर्थ इंटरनॅशन स्कूलमध्ये आयोजित स्नेहसंमेलनामध्ये चिमुकल्यानी सादर केलेल्या कलागुणांनी चांगलाच रंग भरला.
स्नेहसंमेलनाचे उद्घाटन भडगाव न्यायालयाचे न्यायाधीश बी. एस. जगदाळे यांच्याहस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार सी.एम.वाघ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र जाधव, संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, नगरसेविका सुवर्णा पाटील, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आर.के.वंजारी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस.टी.पाटील, स्कूलचे प्राचार्य संजय पुजारी होते.
स्नेहसंमेलनात चिमुकल्यांनी विविध गाण्यांवर लक्षवेधी नृत्याविष्कार सादर केले. त्यांनी सादर केलेल्या नृत्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
कलागुण दाखविण्याची मोठी संधी
यावेळी आपल्या मार्गदर्शनात न्यायधीश बी.एस.जगदाळे म्हणाले की, स्नेहसंमेलन शालेय जीवनात खूप महत्वाचा टप्पा असतो. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विविध कलागुण त्यांना दाखविण्याची मोठी संधी मिळते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सविता भोसले आणि जरीना मन्यार यांनी केले तर प्राचार्य संजय पुजारी यांनी आभार मानले.