पाकिस्तान पण सांगेल शिवसेना कोणाची?, ठाकरेंचा पुन्हा एकदा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 11:29 AM2023-04-24T11:29:08+5:302023-04-24T11:29:46+5:30

‘तुम्ही चोरलेला धनुष्यबाण वापरा’

Pakistan will also tell who Shiv Sena belongs to - uddhav Thackeray | पाकिस्तान पण सांगेल शिवसेना कोणाची?, ठाकरेंचा पुन्हा एकदा निशाणा

पाकिस्तान पण सांगेल शिवसेना कोणाची?, ठाकरेंचा पुन्हा एकदा निशाणा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भाजपकडे स्वतःचा नेता नाही. म्हणून ते दुसऱ्यांचे नेते चोरून मतं मागतात. भाजपने जाहीर करावं, येत्या निवडणुका ते मिंधे गटाच्या नेतृत्वात लढणार आहेत का? मी आव्हान देतो तुम्ही चोरलेलं धनुष्यबाण आणि मोदींचा चेहेरा घेऊन या. मी माझं नाव घेऊन येतो. बघूया महाराष्ट्र कोणाला निवडून देतो, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप व शिंदे गटाला आव्हान दिले आहे.

रविवारी पाचोरा येथे माजी आमदार स्वर्गीय आर. ओ. पाटील यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. राज्यात लवकरच निवडणुका लागतील. त्यामुळे ज्या गद्दारांना शिवसेनेने घोड्यावर बसविले त्यांना आता खाली खेचायची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले. 
भाजप आगामी निवडणुक ही मिंधे गटाच्या नेतृत्वात लढणार आहे का? असा सवाल त्यांनी केला. पावसाळ्यात नाही तर आताच निवडणुका होऊन जाऊ द्या. आमच्या मशालीच्या ज्वालांनी तुमचे सिंहासन जाळल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला.ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. मोदी मी फकीर आहे, असे सांगत आहेत. त्यांच्या मागे पुढे कुणी नाही. ते कधीतरी झोळी लटकवून निघून जाणार, माझ्या जनतेच्या हाती कटोरा देऊन जातील, मग जनतेने काय करायचे, असा सवालही त्यांनी केला.

निवडणूक आयोगावर टीका
ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात करताच उपस्थितांनी प्रतिसाद दिल्यानंतर, शिवसेना कोणाची हे स्पष्ट होत असल्याचे सांगितले. ही जनतेचे समर्थन पाहून पाकिस्तानदेखील सांगणार की शिवसेना कोणाची? मात्र मोतीबिंदू झालेल्या निवडणूक आयोगाला कळले नाही , असे सांगत ठाकरेंनी निवडणूक आयोगावर टीका केली.

Web Title: Pakistan will also tell who Shiv Sena belongs to - uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.