पळासखेडा जैन कॉलेज आॅफ फार्मसी कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 05:01 PM2020-01-20T17:01:17+5:302020-01-20T17:01:32+5:30
पळासखेडा येथील प्रकाशचंद जैन कॉलज आॅफ फार्मसी अॅण्ड रिसर्च या औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.
जामनेर, जि.जळगाव : पळासखेडा येथील प्रकाशचंद जैन कॉलज आॅफ फार्मसी अॅण्ड रिसर्च या औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.
स्नेहसंमेलनाचे उद्घाटन संस्थाध्यक्ष राजकुमार कावडिया यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून सचिव मनोज कावडीया, संचालक अभय कावडिया यांच्यासह संस्थेच्या विविध शाखांचे प्राचार्य व शिक्षक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कावडिया यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या सांस्कृतिक कलागुणांना वाव देण्यासाठी प्रोत्साहित केले, तर प्राचार्य मयुर भुरट यांनी विद्यार्थ्यांसाठी केलेल्या विविध उपक्रमांचा आढावा सादर केला.
इ बुलेटिनचे प्रकाशन
या कार्यक्रमातच २०१८ पासून तर आतापर्यंत महाविद्यालयात झालेले विविध कार्यक्रम तसेच महाविद्यालयाने सहभाग नोंदवलेल्या विविध सामाजिक, शैक्षणिक तसेच सांस्कृतिक उपक्रमांची इ बुलेटिन फार्मा मिर्रर या नावाने मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.
कलागुणांना मिळाली दाद
डी.फार्मसी व बी.फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर लक्षवेधी कलाविष्कार सादर केले. विद्यार्थ्यांनी आपल्या नाटकातून बालकामगार, स्त्री भ्रूणहत्या, अंधश्रद्धा निर्मूलन, शेतकरी आत्महत्या तसेच देशभक्तीपर विविध कलाविष्कार सादर केले. या विषयांची जाणीव व संवेदना उपस्थितांना करून दिली.
प्रास्तााविक प्रा.राहुूल शिंपी, तर आभार प्रदर्शन प्रा.सुनील बावस्कर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.