जळगाव जिल्ह्यातून अपहरण झालेली मुलगी सापडली पालघरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 10:26 PM2018-02-14T22:26:28+5:302018-02-14T22:28:29+5:30

लग्नाचे आमिष दाखवून सोळा वर्षीय मुलीला पळवून नेणाºया तरुणास एलसीबी व सावदा पोलिसांनी बुधवारी पालघर येथून ताब्यात घेतले. सावदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणा-या या मुलीला गावातील एका तरुणानेच ८ फेब्रुवारी रोजी फूस लावून पळविले होते. याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता.

Palghar, who was kidnapped from Jalgaon district, was found in Palghar | जळगाव जिल्ह्यातून अपहरण झालेली मुलगी सापडली पालघरला

जळगाव जिल्ह्यातून अपहरण झालेली मुलगी सापडली पालघरला

Next
ठळक मुद्देलग्नाच्या आमिषाने पळविल्याचे निष्पन्न संशयित तरुणालाही घेतले ताब्यातमुलगी दहावीच्या वर्गात

आॅनलाईन लोकमत
 जळगाव दि १४, :  लग्नाचे आमिष दाखवून सोळा वर्षीय मुलीला पळवून नेणाºया तरुणास एलसीबी व सावदा पोलिसांनी बुधवारी पालघर येथून ताब्यात घेतले. सावदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणा-या या मुलीला गावातील एका तरुणानेच ८ फेब्रुवारी रोजी फूस लावून पळविले होते. याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता.
पीडित मुलगी दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तर तिला पळवून नेणारा तरुण हा मुळचा मध्य प्रदेशातीलच असून तेथे तो कंपनीत नोकरी करतो. पीडित मुलीच्या गावात तो राहायला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे व सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल वाघ यांना मुलगी व मुलाचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक मनोज खडसे, रवींद्र मोरे, विजय पाटील, सुरेश आढायगे, नरेंद्र वारुळे, दिनेश बडगुजर, देवेंद्र पाटील, प्रशांत चिरमाडे यांचे पथक तयार केले होते. या पथकाने मुंबई, ठाणे, मध्यप्रदेश राज्यात अल्पवयीन मुलीचा शोद घेतला. या दरम्यान दोघं जण पालघर येथे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पथकाने बुधवारी दोघांना ताब्यात घेतले. तपास राहूल वाघ करीत आहेत.

Web Title: Palghar, who was kidnapped from Jalgaon district, was found in Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.