‘ लक्ष्मी रमणा गोविंद’ च्या जयघोषात निघालेल्या पालखीने ब्रrाोत्सवाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 12:09 AM2017-10-06T00:09:01+5:302017-10-06T00:14:53+5:30
पारोळा येथे 21 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या ब्रrाोत्सवात विविध वहनांची मिरवणूक, रथोत्सव आणि 5 ऑक्टोबर रोजी पालखी सोहळा पार पडून ब्रrाोत्सवाची सांगता करण्यात आली.
लोकमत ऑनलाईन पारोळा, दि.5 : ‘लक्ष्मी रमणा, गोविंद बालाजी महाराज की जय’ या जयघोषात निघालेल्या पालखी मिरवणुकीने येथील ब्रrाोत्सवाची गुरूवारी रात्री 12 वाजता सांगता झाली. 21 सप्टेंबरपासून सुरू असलेले विविध वहनोत्सव, रथोत्सव आणि त्यांनतर आजचा पालखी सोहळ्याने या ब्रrाोत्सवाची समाप्ती झाली. सकाळी 8.30 वाजता श्री बालाजी मंदिरातून निघालेली पालखी मिरवणूक श्रीराम मंदिरात विसावली. याठिकाणी विहिरीत उतरुन बालाजी महाराजांचे स्नान करण्यात आले. सर्व स्वयंसेवकांनी, विश्वस्त सेवेक:यांनी बांधलेले कंकण सोडले व स्नान केले. पूजाविधी करीत पुन्हा सायंकाळी 7.30 वाजता प्रस्थान करीत बालाजी महाराजांच्या पालखीचे रात्री विसजर्न करण्यात आले. यावेळी लेझीमच्या तालावर युवक नाचत होते. तर नामघोषाने शहर दुमदुमले होते. या प्रसंगी बुधा बारी, वसंत बारी, कृष्णा बारी, राजू बारी, संजय बारी, दयाराम पाटील, प्रकाश चौधरी, नथ्थू बारी, प्रभाकर बारी यांच्यासह मोग:याधारक बांधवांनी पालखी वाहून नेली.