फर्दापूर तांडा येथे पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 02:32 PM2017-12-09T14:32:36+5:302017-12-09T14:39:35+5:30
कल्पवृक्ष कलशाकार तीर्थावर कल्पवृक्षनंदीजी महाराजांना आचार्य पद बहाल
आॅनलाईन लोकमत
वाकोद ता.जामनेर,दि.९ - वाकोद येथून जवळच असलेल्या फदार्पूर तांडा येथील कल्पवृक्ष कलशाकार जैन तीर्थावर ३ डिसेंबर पासून सुरु असलेल्या भव्य पंचकल्याणक प्रतिष्ठा, विश्वशांती महायज्ञ व गजरथ महोत्सवात शनिवारी तिर्थाचे प्रणेते बालाचार्य श्री १०८ कल्पवृक्षनंदीजी महाराज यांना आचार्य पद बहाल करण्यात आले.
यावेळी कल्प वृक्षनंदीजींचे गुरुआचार्य १०८ दर्शनसागरजी महाराज यांच्या उपस्थितीत कल्पवृक्षनंदी महाराज यांचे केस लोचन करण्यात आले. या कार्यक्रमानंतर पदवीदान सोहळा पार पडला. कल्पवृक्ष कलशाकार तीर्थावर सुरु असलेल्या पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवात जन्मकल्याणक सोहळा झाला. आसाम, बिहार, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश व राज्याच्या विविध भागातून जैन समाज बांधव उपस्थित होते.
या सोहळ्यासाठी धर्मकेसरी आचार्य श्री १०८ दर्शनसागर महाराज यांची प्रमुख उपस्थिती आहे. पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवात महाराष्ट्रातील पहिल्या अशा नवग्रह मंदिरात देवतांची प्रतिष्ठा होत आहे. कल्पवृक्षनंदीजी महाराज यांचे गुरु आचार्य श्री दर्शनसागरजी महाराज, सुसनेर (मध्यप्रदेश) यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचकल्याणक सोहळा पार पडत आहे. रविवारपर्यंत चालणाºया या प्रतिष्ठा महोत्सवाला समाज बांधवानी उपस्थित रहावे आसे आवाहन महोत्सव समितीने केले आहे. यशस्वीतेसाठी ब्रम्हचारिणी सपना दीदीसह महोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल बंडी - मुंबई, कार्याध्यक्ष धन्यकुमार जैन - जळगाव, आर.के. जैन, महामंत्री मनोज छाबडा - तोंडापूर, गणेश डेरेकर, महावीर सैतवाल- जळगाव, सतिष साखरे, रमेश अन्नदाते, मोहन जैन, राजेंद्र जैन - पिंपळगाव (हरे.), जितू जैन परिश्रम घेत आहेत.