पोलिसांच्या उपस्थितीत पिकांचे पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 05:19 PM2019-11-04T17:19:26+5:302019-11-04T17:21:02+5:30

भुसावळ , जि.जळगाव : तालुक्यातील कुºहे (पानाचे) येथे अवकाळी पावसामुळे ज्वारी, कपाशी, मका, सोयाबीन आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ...

Panchanam of crops in the presence of police | पोलिसांच्या उपस्थितीत पिकांचे पंचनामे

पोलिसांच्या उपस्थितीत पिकांचे पंचनामे

Next
ठळक मुद्देकुºहे पानाचे येथे आंदोलनाचा इशारा देताच महसूल प्रशासन नरमलेदोन दिवसात पंचनामे करण्याचे आश्वासनरस्ता रोको आंदोलन टळलेपोलीस निरीक्षकांची भूमिका ठरली महत्त्वपूर्ण

भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील कुºहे (पानाचे) येथे अवकाळी पावसामुळे ज्वारी, कपाशी, मका, सोयाबीन आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतरही महसूल विभागाकडून कार्यालयात बसून पंचनामा करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी हाणून पडला. त्यानंतर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुभाष पाटील यांनी रस्ता रोको आंदोलनाचा इशारा देताच महसूल प्रशासन नरमले व त्यांनी पंचनामा करण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये वाढ केली. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले. यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात आली.
दरम्यान, सोमवार ४ रोजी मंडळ अधिकारी सतीश इंगळे, पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या उपस्थितीमध्ये तलाठी प्रवीण मेश्राम, भुसावळ (साताराचे) तलाठी एम.एल. रत्नाची, ग्रामविकास अधिकारी पी.टी. झोपे आदींनी पंचनामे करण्यास प्रारंभ केला. त्यावेळी ग्रा. पं.चे माजी सदस्य सुभाष पाटील, सरपंच रामलाल बडगुजर, उपसरपंच वासू वराडे, माजी उपसरपंच रवींद्र नागपुरे, किशोर वराडे, जितेंद्र नागपुरे यांच्यासह शेतकºयांनी आंदोलन मागे घेत असल्याचे संबंधित अधिकाºयांना सांगितले. त्यामुळे रस्ता रोको आंदोलन टाळले.
यावर्षी उडीद, मूग सोडून सर्वच हंगाम समाधानकारक होता. मात्र दिवाळीच्या वेळेस १५ दिवसांपासून अवकाळी पावसाने हाहाकार माजवला. त्यामुळे ज्वारी, मका, सोयाबीन, कपाशी आदी पिके शेतकºयांच्या हातची गेली. बहुतांशी शेतकºयांनी ज्वारी, सोयाबीन व मका कापलेली होती, तर कापूस वेचणीला आला होता. त्यामुळे कापलेली ज्वारी, मक्याची कणसे व सोयाबीन ही पिके सडून वाया गेली, तर गुरांसाठीचा चाराही कुंजला, तर कपाशीच्या बोंडाला कोंब आले. सर्वच पिके हातची गेल्यामुळे शेतकरी वर्ग उद्ध्वस्त झाला. अशा परिस्थितीत शेतकºयांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे, अशी अपेक्षा शेतकºयांनी व्यक्त केली. शासनानेही पंचनामे करण्याचे आदेश दिले. मात्र अधिकाºयांच्या वेळकाढू व अकार्यक्षमपणामुळे शेतकरी मदतीपासून वंचित रहातील की काय, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे ग्रा.पं.चे माजी सदस्य सुभाष पाटील, सरपंच रामलाल बडगुजर, माजी उपसरपंच रवींद्र नागपुरे, उपसरपंच वासू वराडे, ग्रा.पं.चे माजी सदस्य किशोर वराडे , जितेंद्र नागपुरे , अशोक बडगुजर, प्रल्हाद महाजन, गोकुळ वराडे, सागर वराडे , राहुल पाटील, विजय भावसार, रामकृष्ण गुंजाळ यांच्यासह शेकडो शेतकºयांनी सरसकट पंचनामे करण्यात यावे व एकही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी. यासाठी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र रस्ता रोको आंदोलन करण्यापूर्वीच पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी यशस्वी मध्यस्थी करून आंदोलन स्थगित करण्यात यश मिळवले. कर्मचाºयांमध्ये वाढ केल्यामुळे आंदोलकांचे समाधान झाले. त्यामुळे रस्ता रोको आंदोलनाचा प्रसंग टळला.
यावेळी पोलीस प्रशासनातर्फे पोलीस निरीक्षक कुंभार यांच्यासह एएसआय शिवदास हिरे, पो.कॉ. युनूस शेख, प्रवीण पाटील, अजय माळी, महिला पोलीस कर्मचारी राणी परदेशी, राहुल महाजन, होमगार्ड यासह आर.सी.पी. प्लेटून यांनी बंदोबस्त चोख ठेवला.
दरम्यान, सोमवारपर्यंत ५६५ शेतकºयांच्या शेतीचे पंचनामे झाले तर ४१५ शेतकºयांच्या शेतीचे पंचनामे अद्याप बाकी असल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली आहे. दोन दिवसात पंचनामे पूर्ण होतील, असा विश्वास मंडळ अधिकारी सतीश इंगळे यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Panchanam of crops in the presence of police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.