नवजात शिशू मृत्यू कमी करण्यासाठी पंचसूत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:15 AM2020-12-22T04:15:49+5:302020-12-22T04:15:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : नवजात शिशूचे मृत्यू रोखण्याठी ते कमी करण्यासाठी पंचसूत्री ठरविण्यात आली असून या पंचसूत्रीवर बालरोगतज्ञ ...

Panchasutri to reduce infant mortality | नवजात शिशू मृत्यू कमी करण्यासाठी पंचसूत्री

नवजात शिशू मृत्यू कमी करण्यासाठी पंचसूत्री

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : नवजात शिशूचे मृत्यू रोखण्याठी ते कमी करण्यासाठी पंचसूत्री ठरविण्यात आली असून या पंचसूत्रीवर बालरोगतज्ञ आणि स्त्ररोगतज्ञ संघटनेच्या संयुक्त डिजिटल राष्ट्रीय पेरीनेटोलाॅजी परिषदेत मार्गदर्श करण्यात आले. या ऑनलाईन परिषदेत संपूर्ण भारतातून चारशेहून अधिक तज्ञ डॉक्टरांनी सहभगा नोंदविला. सोमवारी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेदरम्यान ही परिषद पार पडली.

अशी आहे पंचसूत्री

बाळाची नाळ एक मिनिटीे उशीरा कापल्यास रक्तक्षय कमी होऊन लेहाचे प्रमाण वाढते. कमी दिवसाच्या बाळाच्या जन्माआधी आईला स्टिरॉइड्स इंजेक्शन दिल्यास ४० टक्क्यांपर्यंत मृत्यूदर कमी होतो. जन्माच्या काही दिवसांत चाचण्या केल्यास मुलांमध्ये हृदयरोग, बहिरेपणा, मंदत्व वेळेत लक्षात येेऊन पुढील परिणाम टाळता येऊ शकतात. मुदतपूर्व प्रसुती होण्याआधी आइृला मॅग्नेशिअमन सल्फेट हे औषध नसेद्वारे दिल्यास मुलांमधील मेंदूला इजा होऊन मेंदू स्त्राव, सेरेब्रल पालसी हे आजार ४० टक्क््यांपर्यंत टाळता येेऊ शकतात.

पुणे भारती विद्यापीठाचे नवजात शिशू विभागप्रमुख डॉ. प्रदीप सूर्यवंशी, बालरोगतज्ञ संघटनेचे सचिव डॉ. अविनाश भोसले, मुख्य नवजात शिशूतज्ञ डॉ. प्रशांत दीक्षित, डॉ. अनिल खामकर यांनी या पंचसूत्रीबाबत मार्गदर्शन केले. कमी खर्चिक परंतु अत्यंत परिणामकारक अशा या पंचसूत्रीचे अवलंब करून जिल्ह्यातील नवजात शिशू मृत्यू कमी करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सर्वांनी यावेळी सांगितले. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. माया आर्वीकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे, बालरोग विभाग प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरवसे यांनी या परिषदेचे कौतुक केले. जळगाव स्त्री रोगतज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉ. सुजाता महाजन, सचिव डॉ. सारिका पाटील, तुषार नेहते, ज्येष्ठ डॉ. सुदर्शन नवाल, बालरोगतज्ञ डॉ. हेमंत पाटील, डॉ. अजय शास्त्री यांनी या चर्चेत सहभाग नोंदविला. बालरोगतज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. अतुल चौधरी यांनी स्वागत केले. सचिव डॉ. अविनाश भोसले यांनी नियोजन केले तर सचिव डॉ. प्रिती जोशी, खजिनदार डॉ. नरेश नारखेडे यांनी आभार प्रदर्शन केले.

Web Title: Panchasutri to reduce infant mortality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.