जळगाव जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 12:08 PM2019-06-04T12:08:18+5:302019-06-04T12:08:46+5:30
तातडीने मागविले अहवाल
जळगाव : जिल्ह्यात रविवारी मॉन्सूनपूर्व पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.
जिल्ह्यात रविवारी चोपडा, यावल या तालुक्यात मॉन्सूनपूर्व पावसामुळे केळीसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना मिळताच त्यांनी या नुकसानीची तातडीने पाहणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
आठ हजार शेतकऱ्यांना १५ कोटींची भरपाई
जिल्ह्यात गेल्या वर्षी जून २०१८ मध्ये वादळी वारा व अवेळी पावसामुळे केळी पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी केळी उत्पादक शेतकºयांना १५ कोटी ८२ लाख रुपयांची मदत देण्यास सोमवारी मान्यता दिली आहे. ही रक्कम तातडीने जिल्हाधिकाºयांकडे वर्ग करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.
गेल्या वर्षी १ जून ते २१ जून २०१८ या कालावधीत जळगाव जिल्ह्यात वादळी वाºयासह पाऊस झाला होता. त्यामुळे केळी पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईपोटी शेतकºयांना १५ कोटी ८२ लाख ५३ हजार रुपयांचा निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सुमारे ८०१३ शेतकºयांंना ही रक्कम मिळणार आहे. शेतकºयांना ही रक्कम तातडीने देण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
नुकसानीची माहिती प्रपत्रात भरण्याचे आवाहन
जिल्ह्यात रब्बी हंगाम २०१८ साठी फळपीकांसाठी हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे. २ जून, २०१९ रोजी जळगाव, यावल व चोपडा या तालुक्यांमध्ये वादळी वाº्यांमुळे झालेल्या केळी पिकांच्या नुकसानीच्या बाबतीत कंपनीला सुचित करण्यासाठी शेतकºयांनी प्रपत्र-2 भरुन ते ईमेल आयडीवर स्कॅन करुन पाठवावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.
गावात जाऊन होणार पंचनामे
जिल्हाधिकाºयांनी महसूल व कृषी विभागाच्या यंत्रणेला जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सोमवार सकाळपासूनच महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाºयांनी नुकसान झालेल्या गावांमध्ये जाऊन नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत.
मॉन्सूनपूर्व पावसामुळे ज्या शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अशा शेतकºयांंना शासनस्तरावरुन आवश्यक ती मदत करण्यात येईल तसेच ज्या शेतकºयांनी पीक विमा काढलेला असेल त्यांना नियमानुसार भरपाई मिळण्यासाठीचा प्रस्ताव संबंधितांकडे पाठविण्यात येईल, तर ज्या शेतकºयांनी पीक विमा काढलेला नाही.
मात्र, त्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, अशा शेतकºयांना शासनामार्फत भरपाई मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे डॉ. ढाकणे यांनी सांगितले.
सहकार राज्यमंत्र्यांनी केली पाहणी
रविवारी कठोरा, सावखेडा, किनोद व गाढोदा परिसरात झालेल्या वादळी पावसामुळे केळीचे प्रचंड नुकसान झाले. सोमवारी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी या गावांमध्ये नुकसान झालेल्या केळी बागांची पाहणी केली. तसेच शेतकºयांशी चर्चा केली. नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकºयांना आर्थिक मदतीचे आश्वासन त्यांनी दिले.