पाचो:यात रोपण केलेल्या वृक्षांना दिले बारकोड!

By admin | Published: July 16, 2017 06:00 PM2017-07-16T18:00:38+5:302017-07-16T18:00:38+5:30

पाचोरा येथील बोहरा समाजाने दाखविला आगळा मार्ग

Pancho: Barcode given to planted trees! | पाचो:यात रोपण केलेल्या वृक्षांना दिले बारकोड!

पाचो:यात रोपण केलेल्या वृक्षांना दिले बारकोड!

Next

ऑनलाईन लोकमत

पाचोरा,दि.16 - शहरातील बोहरा समाजातर्फे वृक्षसंवर्धनासाठी वेगळी युक्ती लढवत 71 रोपांना बारकोड देऊन वृक्षारोपण करीत वृक्षसंवर्धनाचा नवा मार्ग दाखविला.
बोहरा समाजातर्फे ईद मिलन आणि वृक्षारोपणाचा आगळा वेगळा कार्यक्रम रविवारी संपन्न झाला. कार्यक्रमाला आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, नगराध्यक्ष संजय गोहिल, नगरसेवक अमोल शिंदे, विभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड आणि पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे उपस्थित होते. बोहरा समाजाच्या सैफी बाग दाऊदी बोहरा कब्रस्तानात ही 71 झाडे लावण्यात आली. 
यावेळी जनाब युसूफ, शेख कासम लकडावाला, शब्बीरलोखंडवाला, नज्जुमुद्दीनभाई भारमल, हतीम लकडवाला, अब्बास कपासी हे उपस्थित होते तर सैफी बाग कमिटीचे सदस्य अहमद नेरीवाला, मुतुर्जा बोहरा, मुतुर्जा इझी, मुतुजा बदाम, मुतुर्जा बत्तीवाला , मुतुजा टी. के., ताहेर बोहरा, हकिम भारमल यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
वृक्षांना बारकोड कशासाठी 
प्रत्येक रोपाला एक ठराविक बारकोड दिला जाणार असून त्या रोपांची माहिती संगणकीकृत केली जाणार आहे. वेळोवेळी त्या प्रत्येक रोपांचे संवर्धन करतांना त्या रोपांचे स्थान, वेळोवेळी दिले जाणारे खते ,पाणी आणि इतर सर्व माहितीची संगणकीकृत नोंद ठेवली जाईल. रोपात होणारे बदल याची माहिती व फोटो देखील ठेवले जाणार आहे. दरवर्षी रोपात होणा:या वाढीची आणि बदलाची माहिती दिल्लीला धर्मगुरूंकडे सादर केली जाणार आहे.

Web Title: Pancho: Barcode given to planted trees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.