पाचो:यात युती नाहीच..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2017 12:34 AM2017-01-16T00:34:09+5:302017-01-16T00:34:09+5:30
आर.ओ. पाटील यांची स्पष्टोक्ती : शिवसेना मेळावा
पाचोरा : जळगाव जिल्ह्यात भाजपाशी युती नाही, आणि पाचो:यात तर ती कदापिही होणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन माजी आमदार आर. ओ. पाटील यांनी रविवारी येथे आयोजित शिवसेना मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून बोलतांना केले.
आगामी जि.प.- पं.स. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पाचोरा- भडगाव तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ते व पदाधिका:यांचा मेळावा महालपुरे मंगल कार्यालयात आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. मेळाव्याला मोठय़ा संख्येने शिवसैनिक हजर होते.
यावेळी आमदार किशोर पाटील यांनी सांगितले की, पाचोरा- भडगाव मतदारसंघात विकासकामे झपाटय़ाने होत असून शिवसैनिक हा हाडाचा कार्यकर्ता आहे. यामुळे विकास हाच शिवसेनेचा अजेंडा असून दोन्ही तालुक्यातून जि.प.-पं.स. च्या जागांवर भगवाच फडकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमदार पाटील यांनी पुढे सांगितले की, सरकारमध्ये सहभागी असलो तरी विरोधी व सत्ताधारी पक्ष अशी दुहेरी भूमिका शिवसेनेला पार पाडावी लागत आहे. कारण राज्यात मजबूत विरोधी पक्षच शिल्लक नाही. काँग्रेस- राष्ट्रवादी नेत्याच्ंया कुंडल्या मुख्यमंत्र्यांना माहीत असून सरकारपुढे विरोधी पक्ष नामोहरम होतो. यावेळी केंद्र सरकारने केलेल्या नोटबंदीचा परिणाम काय झाला, याबाबतचा खरपूस समाचार आमदार पाटील यांनी घेतला.
मेळाव्यात अरुण पाटील, राजेंद्र पाटील, प्रकाश सोमवंशी, गणेश परदेशी यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक रावसाहेब पाटील यांनी केले. यावेळी पाचोरा -भडगाव तालुक्यातील अनेक काँग्रेस, राष्ट्रवादी , भाजपा कार्यकत्र्यानी शिवसेनेत प्रवेश केला. मेळाव्याला दीपक राजपूत, ज्ञानेश्वर सोनार, नगराध्यक्ष संजय गोहील, उपनगराध्यक्ष शरद पाटे, शिवदास पाटील, पंढरीनाथ पाटील, उध्दव मराठे, डॉ.एल.टी.पाटील, युवराज पाटील, डॉ.भरत पाटील, दिनकर पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नाना वाघ तर आभार दीपक राजपूत यांनी मानले. (वार्ताहर)
पाचोरा पीपल्स बँक संचालकांना खावी लागणार जेलची हवा
4पाचोरा पीपल्स बँकेत भ्रष्टाचार व हुकूमशाही आहे, यामुळे मनात आणले तर सहा महिन्यात या बँकेच्या संचालकांना जेलची हवा खावी लागेल, असा गर्भित इशाराही आमदार किशोर पाटील यांनी यावेळी दिला. दरम्यान या विधानाबाबत पाचोरा पीपल्स बँकेचे चेअरमन अशोक संघवी यांनी ‘लोकमत’शी दूरध्वनीवरुन बोलताना सांगितले की, सभासदांनी आमच्या प्रामाणिकपणामुळे पूर्ण बहुमत दिले. आमदार किशोर पाटील यांनी जिल्हा बँकेत सुरु असलेल्या व्यवहारांबाबत अधिक लक्ष घालावे. ते पराभव पचवू शकले नाही, यामुळेच ते असे आरोप करीत आहेत, असेही संघवी यांनी स्पष्ट केले.