जळगाव जिल्ह्यातील पं.स. सभापती, सदस्य उद्या देणार सामूहिक राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 12:29 PM2019-06-23T12:29:26+5:302019-06-23T12:30:26+5:30

राज्यस्तरीय लढ्याची जळगावातून सुरूवात

Panchs in Jalgaon District Chairman, member will give up tomorrow's collective resignation | जळगाव जिल्ह्यातील पं.स. सभापती, सदस्य उद्या देणार सामूहिक राजीनामा

जळगाव जिल्ह्यातील पं.स. सभापती, सदस्य उद्या देणार सामूहिक राजीनामा

Next

जळगाव : योग्य सन्मान व विकास कामांसाठी निधी नसल्याने तसेच अधिकाऱांवर गडांतर आल्याने जिल्हाभरातील १५ पंचायत समिती सभापती व १३४ सदस्यांनी सोमवारी सामूहिक राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे़ नमून्यावर त्यांच्या स्वाक्षऱ्याही झाल्या असून महाराष्ट्र पंचायत समिती सदस्य संघर्ष समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला़
शनिवारी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात संघर्ष समितीची बैठक झाली़ अधिकारांवर कात्री लावण्यात आल्याने सदस्यांना हवा तो सन्मान मिळत नसून विकास कामांना निधीच नसल्याने कामे करायला शिल्लक नाहीत, त्यामुळे पंचायत समित्याच बरखास्त करा असा सूर या बैठकीतून उमटला व अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या़ यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता शिंदे (तुळजापूर), शिरीष पटेल यांनी मार्गदर्शन केले़ लग्नात सरपंचांना बसा म्हटले जाते मात्र आपल्याला तीदेखील विचारणा होत नाही, पुढच्या वेळी लग्नाचेही निमंत्रण नसेल, अशी वेळ आल्याची खंत शिरीष पटेल यांनी व्यक्त केली़ ग्रामपंचायत पदाधिकारी विचारत नाहीत, जि़ प़ पदाधिकारी ऐकत नाहीत यात आपण मध्येच अडकून पडल्याचे एक महिला सदस्या म्हणाल्या़ हर्षल चौधरी यांनी विचार मांडले. तर सदस्याला कामच नसेल तर पंचायत समित्या बरखास्त करा, राजीनामा नेहमीच खिशात ठेवा, असे सूर्यकांत खैरनार म्हणाले़ चाळीसगाव पं.स.च्या सभापती स्मितल बोरसे यांनी वृक्षलागवडीचा मुद्दा मांडला़ आधी पंप व ताडपत्री घेऊन शेतकरी समाधानी व्हायचे. आता करावे लागणारे अर्जफाटे व लागणारा वेळ यामुळे आता तिकडेच जावो पंप अशी प्रत्ििर्रक्रया शेतकरी व्यक्त करीत असल्याचे सुभाष पाटील म्हणाले़
आमदारांनी सदस्यांचे खिसे रिकामे केले - श्ािंदे
राज्यस्तरावरून निधी वळवून आमदारांनीच पं़ स़ सदस्यांचे खिसे रिकामे केल्याचा आरोप दत्ता शिंदे यांनी यावेळी केला़ २०० आमदारांना निवेदन दिले मात्र, माजी मंत्री एकनाथराव खडसे व हर्षवर्धन जाधव सोडले तर एकाही आमदाराने मागण्यांना वाचा फोडलेली नाही़ अमळनेर पं.स.चे माजी सभापती सुभाष पाटील यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या विनंतीला मान देऊन निवडणूक लढविली आहे, मात्र, त्यांनी सर्वात आधी गिरीश महाजन यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करावा व आपल्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे मांडण्याची विनंती करावी, सदस्यांनी सभापतींकडे व सभापतींनी जि.प. अध्यक्षांकडे राजीनामा द्यावा, असे त्यांनी यावेळी सांगितले़
सदस्यांनी घेतली खडसेंची भेट
पं.स.सदस्यांनी माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांची शनिवारी सायंकाळी भेट घेतली़ यावेळी आपण विधिमंडळात हा मुद्दा मांडणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले़ बोदवड सभापती रमेश पाटील, यावल पं़ स़ सदस्य शेखर पाटील, रावेरचे सदस्य जितेंद्र पाटील व मुक्ताईनगचे विकास पाटील यांनी या बैठकीचे नियोजन केले.
निधीतून टमरेलच येऊ शकेल़़़
पंचायत समिती सदस्यांच्या निधीवर चौदाव्या वित्त आयोगातून कात्री लावण्यात आली़ आपल्याला केवळ ८५ हजाराचा निधी असल्याचे कळाले तेव्हा आपण अधिकाऱ्यांना सांगितले़, या निधीतून मी माझ्या मतदारसंघातील गावातील ग्रामस्थांना टमरेलच घेऊ शकतो व हे टमरेल घेऊन त्यावर पं़ स़ सदस्यांच्या सेवेने असा उल्लेख करतो़़.. मग झालं़ असा उपहासात्मक टोला यावल पंचायत समितीचे किनगाव येथील सदस्य उमाकांत पाटील यांनी लगावला़ आपल्या अखत्यारित बारा ते पंधरा गावे येत असताना त्यागावाच्या विकासासाठी आपल्या हातात आहे काय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला़
झेरॉक्स कॉपी म्हणून परिचय
रावेर तालुक्यातील दोन पंचायत समिती सदस्यांचे पती या बैठकीला उपस्थित होते़ सुरूवातीला परिचय करून देण्यात त्यांनी टाळाटाळ केली मात्र, सदस्यांच्या आग्रहास्तवर त्यातील एकांनी आम्ही झेरॉक्स कॉपी असल्याचे सांगत सदस्य पती म्हणून ओळख करून दिली़ यावेळी सभागृहात हशा पिकला होता़
या आहेत मागण्या
पंधराव्या वित्त आयोगात वीस टक्के निधी राखीव मिळावा, सर्व सभापतींना जिल्हा नियोजन समितीत सदस्य म्हणून घ्यावे, सर्व सदस्यांना प्रत्येकी स्वतंत्र ५० लाखांचा निधी विकासकामांना मिळावा, मनरेगा कामांच्या मंजुरीचे अधिकार मिळावेत यासह विविध पंधरा मागण्या करण्यात आल्या आहेत़ मागण्या मान्य करा अन्यथा पंचायत समित्या बरखास्त करा, अशी आक्रमक भूमिका सदस्यांनी यावेळी मांडली़

Web Title: Panchs in Jalgaon District Chairman, member will give up tomorrow's collective resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव