पाचोऱ्यात तलाठ्यांचे काम बंद आंदोलन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 06:04 PM2018-01-22T18:04:25+5:302018-01-22T18:09:00+5:30
तलाठ्यांना धमकावणाऱ्या वाळूमाफियांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी पाचोरा तालुक्यातील तलाठ्यांनी सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
आॅनलाईन लोकमत
पाचोरा,दि.२२ : तलाठ्यांना धमकावणाऱ्या वाळूमाफियांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी तालुक्यातील तलाठ्यांनी सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
वाळूमाफियांकडून तलाठी महसूल कर्मचारी अधिकाऱ्यांना धमकावणे, मारहाण करणे आदींमुळे धोका निर्माण झाला आहे. त्यातच अमळनेर येथील वाळूमाफियांनी तलाठी योगेश रमेश पाटील यांना अमानुषपणे मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. वाळूमाफियांना अद्याप अटक झालेली नाही. यासाठी अमळनेर येथील आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत तलाठी कर्मचाºयांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. पाचोरा तालुक्यातील सर्व तलाठी व कर्मचाऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे नागरिकांची कामे खोळंबली आहेत. शासनाची महसूल वसुली थांबली आहे. संशयित आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय तलाठी संघटनेने घेतला आहे, अशी माहिती पाचोरा तलाठी संघटनेचे अध्यक्ष गायकवाड यांनी दिली.