पंढरीचे वारकरी, ते अधिकारी मोक्षाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 09:25 PM2020-06-18T21:25:51+5:302020-06-18T21:26:27+5:30

मुक्तकैवल्य तेजोनिधी संतसम्राट ज्ञानोबाराय यांच्या पालखीचे नुकतेच प्रस्थान झालेले आहे. आजमितीला सर्वजण महासंकटाला सामोरे जात आहेत. संकटे ही प्रत्येकाच्या ...

Pandhari's Warakari, that officer of salvation | पंढरीचे वारकरी, ते अधिकारी मोक्षाचे

पंढरीचे वारकरी, ते अधिकारी मोक्षाचे

Next

मुक्तकैवल्य तेजोनिधी संतसम्राट ज्ञानोबाराय यांच्या पालखीचे नुकतेच प्रस्थान झालेले आहे. आजमितीला सर्वजण महासंकटाला सामोरे जात आहेत. संकटे ही प्रत्येकाच्या जीवनात पदोपदी येत असतात आणि या संकटांना तोंड देण्याची शक्ती पांडुरंग परमात्मा आपल्याला क्षणाक्षणाला प्रदान करत असतात. संसाररूपी प्रपंच चालवत असताना पांडुरंगाच्या भक्तीत जीवन घालवत असताना वारकऱ्यांच्या जीवनातील सुवर्णकाळ म्हणून पंढरीच्या वारीला ओळखले जाते.
वर्षभर काबाडकष्ट करणाºया माझा शेतकरीराजा व वारकऱ्यांसाठी हा सोहळा स्वर्गसुखाच्या अनुभूतीच्या कितीतरी पटीने मोठा असतो. कारण याच वारीत आम्हाला विठूरायांच्या भेटीच्या आसेबरोबर जीवनात यशस्वी वाटचाल कशी करायची याची प्रत्यक्ष अनुभूती मिळते. वारीत सहभागी होणारे प्रत्येकजण आपली संपत्ती, पद, पैसा या सर्व क्षणिक सुख देणाºया गोष्टी विसरून सहभागी झालेले असतात. वारीत प्रत्येकजण फक्त पंढरीचा वारकरी म्हणूनच सहभागी झालेला असतो. जीवनातील सर्वोच्च आनंदाची अनुभूती जर प्राप्त करायची असेल तर जीवनात एकदा तरी पंढरीची वारी करायला हवी. कारण आपण विश्वातील सर्व तीर्थ करून बसलो तरी जो आनंद पंढरीच्या वारीत प्राप्त होत तो अन्य ठिकाणी आपल्याला मिळू शकत नाही. तुकोबाराय वर्णन करतात,
तीर्थे केली कोटीवरी ।
नाहीदेखील पंढरी ।।
आपण कोटीने तीर्थे केली असतील पण जर आपण पंढरीच्या पांडुरंगाला जर वारीतून भेटायला गेला नसाल तर तुमच्या अनेकविध केलेल्या तीर्थांना काहीही फायदा नाही त्यामुळे जीवनात आल्यानंतर प्रत्येकाने एकदातरी वारी करायला पाहिजे. वारी या शब्दातच ‘वार’ हा शब्द येतो आणि निश्चितच पंढरीच्या वारीमुळे पांडुरंग परमात्मा आपल्याला आपल्या अंगी असणाºया षड्विकारांवर वार करण्याची सद्बुद्धी देतात, सर्वजणांनी वारीचे अनन्यसाधारण असे महत्व जाणून वारी करून जीवन सार्थकी लावायला पाहिजे.
तुकोबाराय म्हणतात जर जीवनात दु:खाची विरक्ती व सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल म्हणजेच मोक्षप्राप्ती करून घ्यायची असेल तर पंढरीच्या वारीत सहभागी होऊन सुवणर् पर्वकाळाचे साक्षीदार व्हायला पाहिजे, पण यावर्षी अपवादात्मक परिस्थितीमुळे कोणतेही वारकरी वारीत सहभागी होऊ शकत नाही. अशा वेळेस
यावर्षी घरीच करूया वारी। तेव्हाच पळून जाईल कोरोना महामारी।।
आपणा सर्वांना यावर्षी आपापल्या घरीच राहून विठूरायाला प्रार्थना करायची आहे की, आम्हाला या संकटातून मुक्त करा! निश्चितच विठूराय आपल्या सर्वांच्या हाकेला साद घालून या संकटातून आपल्याला तारेल व आपण पुढच्या वर्षीच्या पंढरीच्या वारीत सहभागी होऊन नक्कीच आनंद घेऊ...!
- गजानन महाराज वरसाडेकर, पिंप्राळा.

Web Title: Pandhari's Warakari, that officer of salvation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव