सरदार वल्लभभाई पटेल शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी पंडित अटाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:18 AM2021-02-24T04:18:12+5:302021-02-24T04:18:12+5:30
चौबे मार्केटसमोर वाहतूक कोंडी जळगाव : शहरातील चौबे मार्केटसमोर रस्त्याच्या दोन्ही बाजूला विविध प्रकारच्या विक्रेत्यांच्या हातगाड्या लागत असल्यामुळे दररोज ...
चौबे मार्केटसमोर वाहतूक कोंडी
जळगाव : शहरातील चौबे मार्केटसमोर रस्त्याच्या दोन्ही बाजूला विविध प्रकारच्या विक्रेत्यांच्या हातगाड्या लागत असल्यामुळे दररोज वाहतूक कोंडी होत आहे. या खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी मनपा प्रशासनाने या विक्रेत्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
सॅनिटाईझ करून बसेस रवाना
जळगाव : कोरोनामुळे जळगाव आगार प्रशासनातर्फे बाहेरगावी जाणाऱ्या प्रत्येक बसचे सॅनिटाईझ करुनच बसेस बाहेरगावी सोडण्यात येत आहे. तसेच बाहेरगावाहून आलेल्या बसेसचेही सॅनिटाईझरने निर्जतुकीकरण करण्यात येत आहे. यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी
जळगाव : सध्या महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे मू. जे. महाविद्यालयाकडे जाणाऱ्या अग्रवाल चौकात सुरू असलेल्या कामामुळे दररोज वाहतूक कोंडी होत आहे. या परिसरातील नागरिकांना वाहने काढतांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी वाहतूक विभागाने या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी होत आहे.
जंतुनाशक औषधांची फवारणी करण्याची मागणी
जळगाव : शहरातील अनेक भागात अनियमित साफसफाई अभावी मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तरी मनपा प्रशासनाने शहरातील सर्व भागात जंतुनाशक औषधांची फवारणी करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.