प्रति पंढरपुर अमळनेरात पांडुरंगाचे झाले आगमन

By admin | Published: May 5, 2017 12:57 PM2017-05-05T12:57:43+5:302017-05-05T12:57:43+5:30

श्री संत सखाराम महाराजांचे परमशिष्य बेलापूरकर महाराज यांच्या दिंडीचे शुक्रवारी अमळनेरात आगमन झाले.

Panduranga of Amravati | प्रति पंढरपुर अमळनेरात पांडुरंगाचे झाले आगमन

प्रति पंढरपुर अमळनेरात पांडुरंगाचे झाले आगमन

Next

 अमळनेर, 5 - श्री संत सखाराम महाराजांचे परमशिष्य बेलापूरकर महाराज यांच्या दिंडीचे शुक्रवारी अमळनेरात आगमन झाले. बेलापूरकर महाराजांचे आगमन म्हणजे प्रतिपंढरपुरात पांडुरंगाचे आगमन झाले असे मानण्यात येते.

बेलापूरकर महाराज यांच्या गादीवरील पुरूष मोहन (मनु) महाराज हे परंपरेप्रमाणे 4 रोजी  रात्रीच अमळनेरात दाखल झाले होते. 5 रोजी  सकाळी साडेसहा वाजता वाडी संस्थानचे 11 वे गादी पुरूष प्रसाद महाराज यांनी शहराची वेशी गाठली.  प्रसाद महाराजांनी बेलापूरकर महाराजांच्या दिंडीचे स्वागत केले. गुरूने शिष्याचे स्वागत करण्याची ही अनेक वर्षाची परंपरा आहे.
तेथे दोन्ही महाराजांचे पाद्य पुजा करण्यात आली. त्यानंतर प्रसाद महाराज व बेलापुरकर महाराज हे बैलांनी जुंपुलेल्या ‘शिग्राम’मध्ये  आसनस्थ  झाले. पुढे वारक:यांची दिंडी, टाळ मृदुंगधारी व त्यामागे ‘शिग्राम’चालत होता. रस्त्यात ठिकठिकाणी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. 
मिरवणुकीत  भाविक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. पहिली पान सुपारी आर.के.नगरच्या गणपती मंदिरात झाली. त्यानंतर दोन-तीन ठिकाणी पान सुपारीचा कार्यक्रम झाला. विजय मारुतीचे दर्शन घेतल्यावर बसस्थानक, पाचपावली, दगडी दरवाजामार्गे दिंडी  सकाळी दहा वाजेच्या सुमारास बोरी नदीपात्रात उतरली.
संत सखाराम महाराजांच्या समाधीचे दर्शन महाराजांनी घेतले. प्रवेशाचा अभंग म्हणत बेलापूरकर महाराजांची दिंडी पैल तिरावरील तुळशीबागेत रवाना झाली.बेलापूरकर महाराजांची दिंडी सुमारे 300 किलोमीटरचा प्रवास करीत अमळनेरात दाखल होत असते.
अनेक वर्षाची परंपरा
संत सखाराम महाराजांचे परम शिष्य श्री शाहू महाराज बेलापूरकर  हे दरवर्षी पंढरपुरला वारी करायचे. त्यांच्या स्वपAात पांडुरंग आले. त्यांनी बेलापूरकर महाराजांना दृष्टांत दिला की,  वैशाखात मी  अमळनेरात असतो. त्यामुळे दरवर्षी बेलापूरकर महाराज यांच्या गादीवरील पुरूष वर्षातील 11 वा:या पंढरपुराच्या करतात व 12 वी वारी अमळनेरला करतात.

Web Title: Panduranga of Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.