साडेचार लाखांचा पानमसाला-सुगंधित तंबाखू जप्त; तिघांविरूध्द कारवाई

By सागर दुबे | Published: May 6, 2023 03:41 PM2023-05-06T15:41:41+5:302023-05-06T15:41:47+5:30

जळगाव-भुसावळ रस्त्यावरील गोडावूनवर पोलिसांची धाड

Panmasala-flavored tobacco worth four and a half lakh seized; Action against three in jalgaon | साडेचार लाखांचा पानमसाला-सुगंधित तंबाखू जप्त; तिघांविरूध्द कारवाई

साडेचार लाखांचा पानमसाला-सुगंधित तंबाखू जप्त; तिघांविरूध्द कारवाई

googlenewsNext

जळगाव : शहरातील जळगाव-भुसावळ रस्त्यावरील एका गोडावूनवर शुक्रवारी रात्री परीविक्षाधीन पोलिस उपअधीक्षकांच्या पथकासह एमआयडीसी पोलिसांनी धाड टाकून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला साडेचार लाखांचा पानमसाला व सुगंधित तंबाखू जप्त केला. या कारवाईत तीन जणांना अटक करण्यात आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत व परीविक्षाधीन उपअधीक्षक आप्पासो पवार यांना शुक्रवारी रात्री जळगाव-भुसावळ रस्त्यावरील एका दुचाकी शोरूमच्या मागील भागातील गोडावूनमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला मानमसाला आणि तंबाखूचा माल साठवून ठेवण्यात आला आहे.

त्यानुसार पवार यांच्या पथकासह एमआयडीसी पोलिसांनी रात्री ८.४० वाजेच्या सुमारास गोडावूनवर धाड टाकली. त्याठिकाणी तीन जण मिळून आले. त्यांची विचारपूस केली असता, त्यांनी त्यांची अमोल तुकाराम वनडोळे (२८, रा.शिरसोली प्र.बो.), विनायक शालिक कोळी (४७,रा.वाल्मिक नगर), भूषण दादा तांबे (३८,रा.शिवाजीनगर) अशी नावे सांगितली. तिघांविरूध्द बेकायदेशीररित्या प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखू बाळगल्याप्रकरणी भादंवि कलम ३२८, १८८, २७२, २७३ सह अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ चे कलम २६ (२)(१),२६ (२)(४), २७ (३)(डी), २८ (३)(ई), ५८,५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा आहे जप्त माल...

पोलिसांनी तिघांविरूध्द कारवाई केल्यानंतर गोडावूनची झडती घेतली. त्यामध्ये १ लाख ७१ हजार रूपये किंमतीचे पानमसाले ११४० पाकिटे आणि सुंगधित तंबाखूचेही ११४० पाकिटे, १ लाख ३८ हजार रूपये किंमतीचे विमल पान मसाल्याचे ७०० पाकिटे, १५ हजार ४०० रूपये किंमतीचे व्ही-१ तंबाखूचे ७०० पाकिटे तसेच १ लाख २८ हजार ६४० रूपये किंमतीचे आरएमडी पानमसाल्याचे २६८ पाकिटे पोलिसांना मिळून आले. असा एकूण ४ लाख ५३ हजार ६४० रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई...

पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली परीविक्षाधीन उपअधीक्षक आप्पासो पवार, एमआयडीसीचे पोलिस उपनिरीक्षक नीलेश गोसावी, दीपक चौधरी, दत्तात्रय बडगुजर, विठ्ठल धनगर, गोपाल पाटील, महेश पवार, हितेश महाजन, भगवान सूर्यवंशी आदींच्या पथकाने केली आहे. तर तपासणीसाठी पानमसाला व तंबाखूचे सॅम्पल देखील पोलिसांनी घेतले आहेत.

Web Title: Panmasala-flavored tobacco worth four and a half lakh seized; Action against three in jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव