बैलाला ढकलल्यावरून पहूर कसबेत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:06 AM2017-08-22T00:06:25+5:302017-08-22T00:13:01+5:30

पोळ्याच्या सणाला गालबोट लागले असून पोलिसांनी 9 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात | बैलाला ढकलल्यावरून पहूर कसबेत हाणामारी

बैलाला ढकलल्यावरून पहूर कसबेत हाणामारी

Next
ठळक मुद्देहाणामारीत भाजपा शहराध्यक्ष जखमीभांडण सोडविण्यास गेलेल्या माजी सरपंचाची पाच तोळ्याची सोन्याची चेन हिसकावली

लोकमत ऑनलाईन पहूर ता. जामनेर : कसबे भागात पोळ्यानिमित्त पोळदरवाजाजवळ आलेल्या बैलाला लोटल्यावरून सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हाणामारी झाली. यात भाजपा शहर अध्यक्ष संदीप जाधव व माजी सरपंच शंकर जाधव यांना मारहाण करण्यात आली. मारहाणीत फायटरचा वापर करण्यात आल्याने संदीप जाधव जखमी झाले आहेत. दरम्यान, हाणामारीत माजी सरपंचाच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावण्यात आल्याचा आरोप असून याप्रकरणी नऊ जणांविरोधात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. यातील दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर गावात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस सूत्रानुसार, भाजपा शहर अध्यक्ष संदीप विठ्ठल जाधव यांच्या बैलाला सुनील भिकारी जाधव यांनी लोटालोट केली, त्याची विचारणा संदीपने केली असता सुनील जाधवसह अनिल भिखारी जाधव, योगेश जाधव, केतन जाधव, अंकुश जाधव, सुपडू तडवी, अमोल उर्फ पप्पू जाधव, जितेंद्र अशोक जाधव, विनोद अशोक जाधव या आरोपींनी मारहाण करून संदीप यास लोखंडी फायटर मारून जखमी केले. तर माजी सरपंच शंकर जाधव हे भांडण मिटविण्यासाठी गेले असता त्यांनाही सुनील जाधव यांनी मारहाण करून पाच तोळ्याची सोन्याची चेन हिसकावून नेल्याचा आरोप आहे. यादरम्यान भांडण सोडविण्यासाठी आलेले युवराज जाधव, सिद्धेश्वर जाधव, समाधान चौधरी, किशोर बनकर, प्रदीप जाधव यांनाही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी संदीप जाधव व शंकर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 9 आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, रात्रीच पाचो:याचे डीवायएसपी केशवराव पातोंड यांनी भेट देऊन पाहणी केली. गावात तणावपूर्ण शांतता असून दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे करीत आहे.

Web Title: पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.