पपईचे भाव गडगडले, किलोला फक्त तीन रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 01:51 AM2018-12-26T01:51:06+5:302018-12-26T01:52:40+5:30

केळी आणि कापसानंतर ज्या हुकमी पिकाकडे बघितले जाते त्या पपईचे भाव गडगडल्यामुळे उत्पादक शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे.

 Papaya's price collapses, only three rupees for a kilo | पपईचे भाव गडगडले, किलोला फक्त तीन रुपये

पपईचे भाव गडगडले, किलोला फक्त तीन रुपये

Next
ठळक मुद्दे कजगाव परिसरात दुष्काळात तेरावा महिन्याची उत्पादकांना अनुभूतीपपई खरेदीदार व्यापाºयांनी भाव पाडल्याची चर्चा

कजगाव ता.भडगाव : केळी आणि कापसानंतर ज्या हुकमी पिकाकडे बघितले जाते त्या पपईचे भाव गडगडल्यामुळे उत्पादक शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे.
सुरुवातीला १४ ते १६ रुपये किलो असलेले पपईचे भाव चक्क ३ रुपयांवर येऊन ठेपल्याने यात शेतकऱ्यांचा झालेला खर्चही निघत नसल्यामुळे दुष्काळात तेरावा महिना अशीच काहीशी स्थिती झाली आहे. काही वर्षांपूर्वी कजगावसह परिसरात केळी व कापसाची दरवर्षी मोठ्या प्रमाणात लागवड केली जात होती. मात्र गेल्या तीन चार वर्षांपासून दिवसेंदिवस कमी होत असलेल्या पावसामुळे शेतकºयांनी इतर पिकाकडे आपला मोर्चा वळविला आहे. यात प्रामुख्याने भाजीपाला तसेच पपई व इतर फळपिकांंच्या लागवडीकडे त्यांचा मोठा कल दिसून आला आहे. तथापि महागडे बी- बियाणे टाकून पिकवलेल्या शेती मालाचे भाव नेहमीच गडगडलेले रहात असल्याने शेतकरी पार मेटाकुटीस आला आहे. या वर्षी संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ आहे. त्यामुळे पपईसारख्या जेमतेम पाण्यावर वाचविलेले फळपीक देखील मातीमोल किमतीत विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. यात झालेल्या खर्चापेक्षा भाव कमी मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सुरुवातीला १४ ते १६ रुपये किलो विकली जाणारी पपई गेल्या आठवड्यापासून चक्क ३ रुपये किलो अशा पडेल भावात व्यापारी मागत आहेत. ते देखील आठ ते दहा दिवस उधार या पध्दतीने व्यवहार होत असून पपई उत्पादकांची पंचाईत झाली आहे.
दुष्काळात तेरावा महिना
शासनाने संपूर्ण जिल्हा दुष्काळी जाहीर केला असला तरी शेतकºयांच्या नशिबी आलेले असाह्यपण कायम आहे. कजगाव भागातील नदी पूर्ण पावसाळ्यात कोरडीच होती. शेत शिवार ओस पडले होते. बागायतदार शेतकºयांच्या विहिरींनीही तळ गाठला होता. अशात जेमतेम पाण्यावर रात्रंदिवस एक करीत काहींच्या हातात पीक पडले, मात्र सारेच भाव गडगडल्याने शेतकºयांचे आर्थिक गणित देखील कोलमडले आहे. निसर्गाच्या मारानंतर शेती मालाचे भाव कोसळल्याने दुष्काळात तेरावा महिना अशीच स्थिती शेतकºयांची झाली आहे एकीकडे पाण्याअभावी पिके उपटून फेकली जात आहेत तर दुसरीकडे भाव नसल्याने शेतकºयांना मनस्ताप होत आहे. सुरुवातीला सहा हजार रुपये क्विंटलप्रमाणे कापूस विकला गेला मात्र या नंतर भाव सारखे गडगडत राहिले. ते आता पाच हजार चारशे ते पाच हजार सहाशे पर्यंत आहेत. भाव वाढीची वाट पाहणाºया शेतकºयांच्या पदरी निराशा पडत आहे.
 

Web Title:  Papaya's price collapses, only three rupees for a kilo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fruitsफळे