‌‌इंग्रजी निवासी शाळांमधील प्रवेश प्रक्रिया प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:19 AM2021-02-09T04:19:14+5:302021-02-09T04:19:14+5:30

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात परिषद जळगाव - शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे नुकतीच अभियांत्रिकी व तंत्रज्ञानातील उद्योनमुख ट्रेंड विषयी आंतरराष्ट्रीय परिषद ...

प्रारंभEnglish process of admission in English residential schools | ‌‌इंग्रजी निवासी शाळांमधील प्रवेश प्रक्रिया प्रारंभ

‌‌इंग्रजी निवासी शाळांमधील प्रवेश प्रक्रिया प्रारंभ

googlenewsNext

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात परिषद

जळगाव - शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे नुकतीच अभियांत्रिकी व तंत्रज्ञानातील उद्योनमुख ट्रेंड विषयी आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यात आली. यावेळी प्रा. डॉ. नरेंद्र चौधरी यांची उपस्थिती होती. परिषदेमध्ये देशभरातून प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला होता.

शरद पांढरे यांची नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जामनेर तालुक्याच्या ओबीसी सेल उपाध्यक्षपदी शरद पांढरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती पत्र जिल्हाध्यक्ष सुनील पाटील व राजेश नाईक यांच्याहस्ते देण्यात आले. निवड झाल्याबद्दल प्रदीप लोढा, श्यामभाऊ सावळे, शैलेश पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.

‛इंग्रजी भाषा कौशल्य’वर मार्गदर्शन

जळगाव - विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल येथे ‛इंग्रजी भाषा कौशल्य’ या विशयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ओरियन सीबीएसई शाळेच्या सुरेखा काबरा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी मातृभाषेचा आदर करायलाच हवा. पण त्याचबरोबर वेगवेगळ्या भाषादेखील अवगत केल्या पाहिजे, असे सांगितले.

विद्यार्थ्यांना पोषण आहार वाटप

जळगाव - प्रगती विद्यामंदिर येथे शालेय पोषण आहाराचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी यात संस्थेचे अध्यक्ष तथा शालेय समितीचे अध्यक्ष प्रेमचंद ओसवाल, अध्यक्षा मंगला दुनाखे तसेच सचिव सचिन दुनाखे, करण पालेशा आदींची उपस्थिती होती. उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा फेगडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

ओळख प्रयोगशाळेची उपक्रम

जळगाव - प्रगती विद्यामंदिर येथे प्रयोगशाळेतील साहित्याची ओळख व्हावी म्हणून 'ओळख प्रयोग शाळेची' हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात शिक्षक मनोज भालेराव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विविध साहित्य विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले त्यांची माहिती सांगण्यात आली.

मधुमक्षिका पालनाचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव - जळगाव जिल्हयातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविला जात आहे. प्रकल्पामध्ये जळगाव जिल्हयातील ४६० गावांची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये मधुमक्षिका पालन ही वैयक्तिक लाभाची बाब देय केली जात आहे. त्यामुळे मधुमक्षिकापालनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे.

आदर्श सिंधी सहेली मंडळाची कार्यकारिणी जाहीर

जळगाव - आदर्श सिंधी सहेली मंडळाची नुकतीच नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. मंडळाच्या अध्यक्षपदी राणी भागदेव यांची, तर उपाध्यक्षा निर्मला उदासी, सचिव शोभा वालेचा, जॉईंट सेंक्रेटरी रेशमा बेहरानी, खजिनदार उषा जवाहरानी, पीआरओ म्हणून हर्षा केसवाणी यांची निवड करण्यात आली आहे.

विद्यापीठातील रस्त्यांची दुरूस्ती

जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील खराब रस्त्यांच्या दुरूस्तीला सुरुवात झाली आहे. विद्यापीठ आवारातील रस्त्यांची दुरवस्था झाली होती. शहरातील रस्त्यांप्रमाणे या रस्त्यावर जागो-जागी खड्डे पडले होते.

Web Title: प्रारंभEnglish process of admission in English residential schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.