बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे परशुराम जन्मोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:16 AM2021-05-15T04:16:01+5:302021-05-15T04:16:01+5:30
जळगाव : बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे दरवर्षी परशुराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यंदाचा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ...
जळगाव : बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे दरवर्षी परशुराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यंदाचा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अत्यंत साधेपणाने पूजन करून उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विश्वकल्याणासाठी, कोरोना महामारीपासून संरक्षण, बचाव करण्यासाठी विशेष पूजन करण्यात आले. भगवान परशुरामाच्या मूर्तीला लघुरुद्राभिषेक करून पुरुषसुक्त व विष्णुसहस्त्रनाम पठण करण्यात आले.
बहुभाषिक ब्राह्मण संघाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत खटोड, विद्यमान अध्यक्ष अशोक वाघ, माजी अध्यक्ष संजय व्यास, सुरेंद्र मिश्रा यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी लेखराज उपाध्याय, शिवप्रसाद शर्मा, विश्वनाथ जोगी, बहुभाषिक ब्राह्मण महिला संघाच्या अध्यक्षा अमला पाठक, मोहन तिवारी, महेंद्र पुरोहित, किशन अबोटी, श्रीतेज पाठक, सिध्दांत फडणीस, डॉ निलेश राव, कमलाकर फडणीस, अभय पाठक, निरंजन कुलकर्णी, दिलीप सिखवाल, अनिल मराठे यांनी सहकार्य केले. फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी भेट दिली. राजा जोशी व त्यांचे सहकार्य यांनी पौराहित्य केले. यंदा समाजबांधवांकडे भगवान परशुरामाच्या प्रतिमा पोचविण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी घरीच प्रतिमा पूजन केले. दरम्यान छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त समाजबांधवांनी अभिवादन केले.