रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयात पालक सभा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 07:49 PM2019-09-23T19:49:40+5:302019-09-23T19:50:56+5:30
जळगाव - जी.एच.रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाची नुकतीच पालक सभाझाली. सभेत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आढावा घेण्यात आला. याप्रसंगी सुरुवातीला सरस्वती मूर्तीचे पूजन ...
जळगाव- जी.एच.रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाची नुकतीच पालक सभाझाली. सभेत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आढावा घेण्यात आला. याप्रसंगी सुरुवातीला सरस्वती मूर्तीचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले़
यावेळी व्यासपीठावर प्राचार्य प्रल्हाद खराटे, समन्वयिका प्रा.सोनल तिवारी, प्रा. दिपक पाटील उपस्थित होते. प्रत्येकाच्या आयुष्यात विद्यार्थी दशेतील जीवन अत्यंत महत्वाचे असते. विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार, शिक्षा देण्याचे काम पालक व शिक्षकांचे असते या अनुषंगाने पालक सभेत विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याचा पूर्णपणे प्रयत्न करता यावा या उद्देशाने पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याच्या पद्धती, पेपर लिहिताना मांडावयाचे मुद्दे, वर्गातील नियमितता, आपली जबाबदारी आदी बाबतचे महत्व सांगून विद्यार्थ्यांच्या घेण्यात येणाºया परीक्षा, प्रात्याक्षिके, प्रकल्प, तोंडी परीक्षा यांचे नियोजन व पुढील अभ्यासक्रम सुरु करण्याच्या सूचना प्राचार्य प्रल्हाद खराटे यांनी यावेळी विध्यार्थी व उपस्थित पालकांना दिल्या. तसेच विद्यार्थ्यांचे प्रगती पत्रक संबंधित पालकांना पहावयास मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पल्लवी भालेराव तर आभार राखी वाघ यांनी मानले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.