तेली समाजाचा रविवारी राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 09:18 PM2019-11-16T21:18:46+5:302019-11-16T21:19:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरातील श्री संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशिय संस्थेतर्फे १७ नोव्हेंबर रोजी तेली समाजाच्या राज्यस्तरीय वधु-वर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरातील श्री संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशिय संस्थेतर्फे १७ नोव्हेंबर रोजी तेली समाजाच्या राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला देशभरातून १५ हजारांवर समाज बांधव व भगिनींची उपस्थिती राहणार असून २ हजारांवर इच्छुक वधू-वरांची आजवर नोंदणी झाली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अनिल चौधरी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
पुष्पावती गुळवे शाळेच्या आवारात शुक्रवारी आयोजित या पत्रकार परिषदेला अध्यक्ष अनिल चौधरी, उपाध्यक्ष प्रशांत सुरळकर, उपाध्यक्ष सुभाष चौधरी, प्रकाश चौधरी, संदीप चौधरी, देविदास चौधरी, उमेष चौधरी, भारत चौधरी, विलास चौधरी, प्रकाश चौधरी, महेंद्र चौधरी, अशोक चौधरी आदींची उपस्थिती होती़ रविवारी सकाळी १०.३० वाजता माजी नगराध्यक्ष सुरेश सिताराम चौधरी यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. यावेळी दीपप्रज्वालन आमदार गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, बबनराव चौधरी, सुरेश भोळे, माजी आमदार शिरीष चौधरी, संतोष चौधरी, विजय चौधरी, महापौर सीमाताई भोळे यांच्या हस्ते होणार आहे.
मौर्य युवा फाउंडेशनतर्फे युवक-युवती परिचय मेळावा
मौर्य युवा फाउंडेशनच्यावतीने रविवारी १७ नोव्हेंबर रोजी महाबळ रस्त्यावरील हतनुर सांस्कृतिक हॉल येथे युवक-युवती परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. संस्थेचे सल्लागार शितलाप्रसाद मौर्य, कन्हैय्यालाल मौर्य व अयोध्याप्रसाद मौर्य यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम होईल़ समाज बांधवांनी मोठ्या ंसंख्येने कार्यक्रमात उपस्थिती द्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.