मुलांच्या भांडणातून शिक्षकांसमोरच पालकाने विद्यार्थ्याला बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 06:14 PM2018-04-03T18:14:44+5:302018-04-03T18:14:44+5:30

सेंट लॉरेन्स स्कूलमधील घटना : मारहाण केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार

Parents have changed the student in front of the teacher by the children's dispute | मुलांच्या भांडणातून शिक्षकांसमोरच पालकाने विद्यार्थ्याला बदडले

मुलांच्या भांडणातून शिक्षकांसमोरच पालकाने विद्यार्थ्याला बदडले

Next
ठळक मुद्देमुख्याध्यापकांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने पालकांनी मुलाला घेऊन गाठले पोलीस ठाणेमुलाच्या या एकांगी माहितीवरुन संतापलेल्या पालकाने विद्यार्थ्याला केली मारहाणपोलिसांनी बोलविले संबधित पालकांना

आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.३ : गेल्या आठवड्यात वर्गात बसलेल्या विद्यार्थ्याला दगड मारुन फेकल्याची घटना ताजी असताना मंगळवारी दोन विद्यार्थ्यांच्या भांडण झाले. त्यातील एका विद्यार्थ्याच्या पालकाने शाळेत येऊन शिक्षकांसमोरच विद्यार्थ्याला बदडून काढल्याची घटना घडली. दरम्यान, या प्रकारामुळे संबंधित विद्यार्थ्याच्या पालकांनी मुलाला घेऊन पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
याबाबत पालकांनी दिलेली माहिती अशी की, पंचमुखी हनुमान मंदिरानजीक असलेल्या सेंट लॉरेन्स स्कूलमध्ये मंगळवारी दोन विद्यार्थ्यांमध्ये किरकाळ कारणावरुन वाद झाला. त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. एका विद्यार्थ्याने ही माहिती त्याच्या वडिलांना सांगितली. मुलाच्या या एकांगी माहितीवरुन संतापलेल्या पालकाने थेट स्कूल गाठून मुलाशी वाद घालणाऱ्या दुसºया मुलाला बदडून काढले.
मुलाला घेऊन गाठले पोलीस ठाणे
पालकाने शाळेत येऊन दुसºया मुलाला मारहाण केल्यामुळे या विद्यार्थ्याने देखील आई व वडीलांना माहिती दिली. त्यांनी लागलीच शाळेत जाऊन शिक्षक व मुख्याध्यापकांना जाब विचारला, मात्र त्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळे त्यांनी मुलाला घेऊन एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. तेथे झाल्याप्रकाराची माहिती पोलिसांना दिली. सहायक फौजदार अतुल वंजारी यांनी मुलाच्या आईची तक्रार घेतल्यानंतर संबंधित पालकाला बोलावण्यासाठी निरोप दिला, मात्र त्यांनी पोलीस ठाण्यात येणे टाळले. तक्रारदार पालक पशुवैद्यकिय डॉक्टर आहेत.

Web Title: Parents have changed the student in front of the teacher by the children's dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.