पालकांनो वेळीच लक्ष द्या; आपला मुलगा सतत एकटा राहतो, भाषा विकासाला विलंब होतो का?

By विजय.सैतवाल | Published: April 1, 2023 04:17 PM2023-04-01T16:17:57+5:302023-04-01T16:18:29+5:30

२ एप्रिल हा जागतिक ऑटिझम जनजागृती दिवस म्हणून साजरा केला जातो. या अवस्थेविषयी जनजागृती केली जाते, यासोबत पालकांनीही सजग होणे आवश्यक असल्याचा सल्ला दिला जात आहे.

Parents pay attention; Is your child constantly lonely, delayed in language development? | पालकांनो वेळीच लक्ष द्या; आपला मुलगा सतत एकटा राहतो, भाषा विकासाला विलंब होतो का?

पालकांनो वेळीच लक्ष द्या; आपला मुलगा सतत एकटा राहतो, भाषा विकासाला विलंब होतो का?

googlenewsNext

जळगाव : शिकलेले शब्द, बडबडीचे आवाज किंवा सामाजिक कौशल्ये विसरणे, नजर देणे टाळणे,  सतत एकटे रहाणे इतर लोकांच्या भावना समजून घेण्यात अडचण येणे,  भाषाविकासाला विलंब लागणे, अशी लक्षणे आपल्या मुलांमध्ये आढळून आल्यास वेळीच लक्ष द्या. कारण ही लक्षणे ‘ऑटिझम’ (स्वमग्नता) या मेंदूच्या वेगळ्या अवस्थेची आहे. त्यांचे जलद निदान व उपचार झाल्यास आपली मुले त्यातून बाहेर पडू शकतात. 

२ एप्रिल हा जागतिक ऑटिझम जनजागृती दिवस म्हणून साजरा केला जातो. या अवस्थेविषयी जनजागृती केली जाते, यासोबत पालकांनीही सजग होणे आवश्यक असल्याचा सल्ला दिला जात आहे. ऑटिझम हा आजार नसून ती मेंदूची अशी अवस्था आहे, ज्यामध्ये व्यक्तीचे बोलणे संवाद साधणे, वागणे आणि काही वर्तने समाजात सामान्य मानल्या जाणाऱ्या वर्तनांपेक्षा वेगळे असू शकतात. ऑटिझम ही एक ‘न्यूरो डाएव्हर्जन्स’ (मानसिक विभिन्नता) म्हणजेच मेंदूची काम करण्याची वेगळी पध्दती, असे म्हटले जाते. 

मेंदूच्या पेशींची जोडणी वेगळ्या प्रकारची
ऑटिझम हा न्युरो डेव्हलेपमेंटल डिसऑर्डर आहे. त्याची निश्चित कारण अजूनतरी समजू शकलेली नाही. गर्भावस्थेपासून या मुलांच्या मेंदूच्या पेशींची जोडणी वेगळ्या प्रकारची असल्याने मेंदूची वेगळी कार्यप्रणाली दिसून येते.  सर्वसाधारण मुलं जेव्हा इतर लोक जे बोलतात, वागतात त्याला समजून घेऊन त्याला प्रतिसादात्मक कृती करतात त्यासाठी आवाज, शब्द आणि हालचालीचा वापर करतात. पण ऑटीझम झालेल्या मुलांमध्ये या जाणिवा तितक्याशा विकसित झालेल्या नसतात म्हणूनच त्यांच्या वागण्यामध्ये वेगळेपणा जाणवतो. 

मिळून-मिसळून खेळण्यासाठी अनुत्सकता
संवाद सुरु कसा करावा आणि तो पुढे कसा न्यावा हे ऑटीझम झालेल्या मुलांना कळत नाही. या समस्यांमुळे ऑटिझम झालेली मुलं इतर मुलांमध्ये मिळून-मिसळून खेळण्यासाठी उत्सुक नसतात. 

मुलींपेक्षा मुलांमध्ये चार पटीने अधिक प्रमाण
ऑटीझमचे प्रमाण मुलींपेक्षा मुलांमध्ये चार पटीने अधिक असते. विशेष म्हणजे सर्व प्रदेशातील तसेच सर्व आर्थिक-सामाजिक स्थरातील मुलांमध्ये ऑटीझम आढळतो. 

बहुतेक मुलांचे निदान वयाच्या चौथ्या वर्षानंतर ऑटिझमचे निदान वयाच्या दुसऱ्या वर्षीच केले जाऊ शकते, तरीही बहुतेक मुलांचे निदान वयाच्या चौथ्या वर्षानंतर होते. 

जलद उपचार चांगल्या भवितव्याची गुरुकिल्ली
आपल्याला जरी ऑटिझमची कारणे माहीत नसली तरी जलद निदान आणि उपचार ही मुलांच्या चांगल्या भवितव्याची गुरुकिल्ली आहे हे मात्र निश्चित आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

विकासात्मक आणि वर्तनात्मक पद्धतींचा वापर जर लवकरात लवकर मिळणाऱ्या उपचार सेवेमध्ये समाविष्ट केला तर सामाजिक संभाषण संवाद कौशल्य यांच्यामध्ये नक्कीच सुधारणा होऊ शकते. विशिष्ट थेरपीमुळे ऑटीझम झालेली मुलं ही चांगल्या तर्‍हेने आयुष्य जगू शकतात. फारच अवघड वर्तन दिसत असेल तर केवळ काही स्थितींमध्येच या समस्येवर औषधोपचारांची आवश्‍यकता पडू शकते. 
- डॉ. अविनाश भोसले, बालरोग तज्ज्ञ, जळगाव

Web Title: Parents pay attention; Is your child constantly lonely, delayed in language development?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.