पारोळा बसस्थानकाची सुरक्षा आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 07:14 PM2018-08-17T19:14:07+5:302018-08-17T19:15:02+5:30

चोºयांना आळा घालण्यास होणार मदत

Parola Bus Station Security Now CCTV Camera | पारोळा बसस्थानकाची सुरक्षा आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात

पारोळा बसस्थानकाची सुरक्षा आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात

Next


पारोळा, जि.जळगाव : पारोळा बसस्थानकात भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातल्यानंतर एसटी महामंडळ प्रशासन जागे झाले आणि आता या बसस्थानकावर सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. त्यामुळे भुरट्या चोºया, रोडरोमियोंना आळा बसण्यास मदत होणार आहे.
पारोळा तालुक्यात १४० खेडी आहेत. तसेच शहरातून राष्टÑीय महामार्गालगत बसस्थानक आहे. त्यामुळे या बसस्थानकात प्रचंड गर्दी असते. प्रवाशांची सुरक्षा ही कित्येक दिवसांपासून वाºयावर होती. याबाबत अनेकदा मागणीदेखील झाली, परंतु जिल्ह्यात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसले, मात्र त्यापासून पारोळा वंचित राहिले होते. त्याचा फायदा चोरटे घेत होते. गेल्या काही महिन्यांपासून बसस्थानकात एक दिवसाआड रोज चोºया होत होत्या. त्यात पाकीट चोरी, सोनखळी चोरी, मंगळपोत, बॅग चोरीचे अशा अनेक प्रकारच्या निरनिराळ्या चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय होऊन चोºया होत होत्या. चोºया होऊनही चोराचा तपासच लागत नव्हता. त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे फार महत्त्वाचे होते आणि ते आज अस्तित्वात आले. या बसस्थानकात एकूण ११ कॅमेरे बसविण्यात आले. त्याची किंमत सुमारे पाच ते सहा लाख रुपये एवढी आहे. कॅमेरे हे दोन्ही प्रवेशद्वार, चौकशी विभागाजवळ, बस पार्किंग झोन, मध्यभागी आदी परिसरात बसविण्यात आले आहेत. यामुळे संपूर्ण बसस्थानक व बाहेरील काही परिसरावर यात कैद केला जाईल. आजपासून या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. एका खासगी ठेकेदाराला हे काम देण्यात आले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात हे काम पूर्ण होईल आणि संपूर्ण बसस्थानक परिसर सीसीटीव्हीच्या नजरेत येईल.
बसस्थानकात वाढलेली रोडरोमियो, किरकोळ कारणावरून होत असलेल्या हाणामाºया हा प्रकार सध्या जास्तच प्रमाणात वाढला होता. आता तो आटोक्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
याशिवाय पोलिसांनादेखील चोरट्यांचा शोध घेणे सोपे होईल व हुल्लडबाजी करणाºयांंना लगाम लावता येईल म्हणून आता प्रवाशी काहीसे बिनधास्तपणे वावरू शकतील.
या वेळी बसस्थानकातील अधिकारी बी.एल.वाघ, माधवराव पाटील, बी.आर.पाटील, बागडे, सोनावणे आदी उपस्थित होते.
 

Web Title: Parola Bus Station Security Now CCTV Camera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.