एकरी ५० हजार नुकसान भरपाई देण्याची शेतकरी संघटनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 09:56 PM2019-09-16T21:56:42+5:302019-09-16T21:57:04+5:30

पारोळा : तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. मात्र सततच्या भिजपावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तालुक्यात अनेक गावांत घरांची ...

 Parola Farmers' Association demands to pay Rs | एकरी ५० हजार नुकसान भरपाई देण्याची शेतकरी संघटनेची मागणी

एकरी ५० हजार नुकसान भरपाई देण्याची शेतकरी संघटनेची मागणी

Next


पारोळा : तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. मात्र सततच्या भिजपावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तालुक्यात अनेक गावांत घरांची पडझड झालेली आहे. या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी, अशी मागणी तालुका शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांनी केली आहे.
तत्काळ पंचनाम्याचे आदेश देऊन कापूस व मका पिकासाठी प्रत्येकी एकरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. तहसीलदार ए.बी.गवांदे यांना याबाबत १६ रोजी निवेदन दिले. यावेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, उपाध्यक्ष दत्तू पाटील, प्रवक्ते प्रा.भिकनराव पाटील, शहर उपाध्यक्ष भूषण निकम, विनोद पाटील, अविनाश पाटील, शिरीष पाटील, नरेंद्र चौधरी, निलेश पाटील, भारत पाटील, शांताराम पाटील, यशवंत शिंपी, धर्मेंद्र पाटील, ज्ञानेश्वर कोडी, रवींद्र पाटील आदींसह शेतकरी उपस्थित होते.
पारोळा कृषी विभागाला कायमस्वरूपी तालुका कृषी अधिकारी नसल्याने मार्गदर्शनाअभावी शेतकºयांची तारांबळ उडते. कायमस्वरूपी कृषी अधिकाºयांची नेमणूक करण्यात यावी, अशीही मागणी शेतकरी संघटनने केली.

Web Title:  Parola Farmers' Association demands to pay Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.